Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

9 वर्ष आधी मरतात डावखोर

9 वर्ष आधी मरतात डावखोर
मुलींच्या तुलनेत मुले डाव्या हाताने अधिक काम करतात. 13 ऑगस्ट डावखोर दिवस म्हणून साजरा केला जातो. शोधाप्रमाणे डावखोर दारूडे आणि डिसलेक्सिया ग्रसित असतात.
 
असा दावा करण्यात आला आहे की डावखोर उजव्या हाताने काम करण्यार्‍यांच्या तुलनेत 9 वर्ष आधी मरण पावतात. तसेच 40 वय पार केलेल्या स्त्रियांमध्ये 20 आयू असलेल्या महिलांच्या तुलनेत डावखोर बाळ होण्याची शक्यता अधिक असते.
 
इतिहासावर प्रकाश टाकल्यास मा‍हीत पडेल की डावखोर अधिक कजाग आणि गुन्हेगार प्रवृत्तीचे असतात. इंग्रजीत लेफ्ट (left) शब्द lyft हून बनला आहे ज्याच्या अर्थ आहे कमजोर किंवा तुटलेला. अनेक लोकं डाव्या हाताने काम करणे वाईट समजतात कारण टॉयलेटमध्ये हाच हात वापरण्यात येतो.
 
दुनियेत अनेक स्थान असे आहे जिथे मुलांना डाव्या हाताने काम करण्यावर शिक्षा दिली जाते. ख्यातनाम लोकांमध्ये बराक ओबामा, ओसामा बिन लादेन, बेंजामिन फ्रँकलिन, अल्बर्ट आइनस्टाइन, अलेक्झांडरदेखील लेफ्टी होते. 50 टक्के उंदीर आणि मांजरी डाव्या पंज्याने खातात. तर मनुष्यांमध्ये मात्र 10 टक्के लोकं लेफ्टी असतात.
 
डावखोर लोकांच्या मेंदूच्या डावी आणि उजव्या बाजूत चांगले संतुलन आणि संबंध असतात. ते एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळण्यात कुशल असतात. डावखोर चित्र बनवताना त्याला उजवीकडे वळवतात. डावखोर उजव्या हाताने सोपेरित्या काम करू शकतात. हे लोकं दोन्ही हाताने लिहू शकतात.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार