Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वयाच्या 10 व्या वर्षात लिहिली इंग्रजी कादंबरी

वयाच्या 10 व्या वर्षात लिहिली इंग्रजी कादंबरी
जर स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्याकहे प्रचंड इच्छाशक्ती आहे, तर यश मिळवणे अवघड नसते असे म्हणतात.  मग वय कितीही असो. असाच एक कारनामा पिथौरागढ जवळील हुडेती गावातील एका दहा वर्षाच्या बालकाने करून दाखवला आहे. या बुद्धिमान बालकाचे नाव आहे हार्दिक उप्रेती.
 
जे वय खेळण्या-बागडण्याचे असते त्याच वयात हार्दिक उप्रेतीने इतिहास रचून आपल्या डोंगराळ प्रदेशाचे नाव उज्जवल केले आहे. त्याची लहान वयातील कामगिरी कोणत्याही स्वप्नवत कामगिरीहून कमी नाही. 
 
मिळालेल्या माहितीनुसार दहा वर्षीय हार्दिकने इंग्रजी भाषेत 'ख्रिसमस मिरॅकल' नावाची कादंबरी लिहिली आहे. हार्दिकची ही पहिलीच  कादंबरी आहे. ही कादंबरी ब्लू रोज पब्लिकेशनने मार्च महिन्यात प्रकाशित केली आहे. अ ख्रिसमस मिरॅकल कादंबरी ५९ पानांची व ९ भागांमध्ये छापली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार हार्दिक बीजीएस इंटरनॅशनल स्कूल दिल्ली येथे सहावीच्या वर्गात शिकत आहे. त्याचे वडील लोकेश उप्रेती दिल्लीत एका मल्टीनॅशनल कंपनीत डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत तर आई गृहणी आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रामदेव बाबांना पाकमध्ये साजरा करायचा योग दिवस