आई होणे हे कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात फार आनंदाचे असते, परंतु या महिलेची कथा ऐकून आपण चक्रावून जातो.
मरीयम नबातांजी, वय 37, ही युगांडात राहणारी आहे. तिने 38 मुलांना जन्म दिला आहे. तिचे लग्न खूपच कमी वयात झाले व ती 13 वर्षांची असताना पहिल्यांदा आई बनली. कबिम्बिरी गावात मरीयम राहते. तिला तेथे सगळे जण मुलांना जन्माला घालणारे यंत्र असेच म्हणतात. तिने सहा वेळेस जुळ्यांना, चार वेळा चार मुलांना जन्म दिला. तिने फक्त दोन वेळेलाच एकेका बाळाला जन्म दिला.
माझ्या वडिलांना वेगवेगळ्या महिलांकडून 45 अपत्ये होती, असे मरीयमने सांगितले. मरीयमच्या मुलांना आपल्या वडिलांचा चेहराही आठवत नाही. आणि ते आपल्या भावंडांच्या देखभालीत आईला मदतही करत नाहीत.