Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Attachment theory: अॅटॅचमेंट थिअरी: दृढ नातेसंबंधांचं गूढ आहे स्पर्शात

Attachment theory: अॅटॅचमेंट थिअरी: दृढ नातेसंबंधांचं गूढ आहे स्पर्शात
, मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (21:10 IST)
आपले आपल्या साथीदारांशी कसे नातेसंबंध राहतील याचं उत्तर आपल्या बालपणात आहे असं तुम्हाला कुणी सांगितलं तर.
 
ज्या प्रकारे आपलं बालपण गेलं आहे त्यानुसार आपण प्रौढ वयात नातेसंबंधांविषयीची आपली मतं तयार करतो आणि त्यावरून आपण आपल्या जोडीदारासोबत कसे संबंध बनतील हे ठरतं.
 
ऐकायला थोडं गमतीशीर वाटत असेल पण संशोधकांचं म्हणणं आहे की लहानपणी आपल्या आई-वडिलांशी आपले नातेसंबंध कसे होते, त्यांच्या आपण किती जवळ होतो, त्यावरून आपल्या जोडीदारासोबतचं आपलं नातं ठरतं.
 
अॅटॅचमेंट थिअरी काय आहे?
काही जणांना स्वत:कडे लोकांचं लक्ष जावं असं वाटतं. काहीजण आपल्याच विश्वात आनंदी असतात. आपलं मन कसं काम करतं हे यातून कळतं. आपली प्रेमभावना, सामाजिक नाती आणि आईवडिलांशी ऋणानुबंध कसे आहेत यावरुन अनेक गोष्टी ठरतात.
 
अटॅचमेंट थिअरीनुसार आपलं बालपण ज्या पद्धतीने जातं त्यानुसार प्रौढ झाल्यावरची आपली विचारप्रक्रिया ठरते. तो कृतीकडे कसं पाहतो ते ठरतं.
 
जॉन बोलबाय आणि मेरी अँन्सवर्थ या मानसोपचारतज्ज्ञांनी हा सिद्धांत विकसित केला. युद्धोत्तर ब्रिटनमध्ये या सिद्धांतांचं मूळ सापडतं.
 
प्रयोग कसा करण्यात आला?
युद्धादरम्यान काही मुलं पालकांपासून विलग झाली. वेगळ्या लोकांबरोबर त्यांचं बालपण गेलं. ही मुलं शहरापासून दूर गावांमध्ये लहानाची मोठी झाली.
 
त्या मुलांना खाण्यापिण्याची भ्रांत नव्हती. काही मुलांनी पालकांपासून वेगळं होऊन राहणं या घटनेचा चांगल्या पद्धतीने स्वीकार केला असं बोलबाय-अँन्सवर्थ जोडीच्या लक्षात आलं.
 
काही मुलं कटकटी स्वभावाची झाली, चिडचिडही करायची. त्यांना त्यांच्या पालकांपासून वेगळं राहायचं नव्हतं. बाकीची काही मुलं खूश नव्हती पण तेवढं त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसलं नाही. काही मुलांवर या घटनेचा फारसा परिणामच झाला नाही, ते नेहमीप्रमाणे वागत बोलत होते.
 
एकमेकांच्या अभ्यासातून या दोघांना लक्षात आलं की मुलांचं त्यांच्या पालकांशी जे नातं असतं त्याचा आपण मोठं झाल्यावर कसे वागतो- विचार करतो, बोलतो त्यावरच मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतं.
 
काही माणसं नातेसंबंधांमध्ये अतिशय सहजतेने वावरतात. कधी प्रेम व्यक्त करायचं, कुठे व्यक्त करायचं हे त्यांना कळतं. कधी आपल्या जोडीदाराला स्पेस द्यायची याचंही त्यांचं आकलन उतम असतं. अशा मंडळींना सेक्युअरली अटॅच्ड म्हटलं जातं.
 
मुलांच्या संगोपनातही हे झळकतं. मुलांना वाढवतानाही त्यांच्या वागण्यात एकप्रकारचा नियमितपणा असतो. पालक म्हणून काय करायला हवं, काय नको, कुठल्या मर्यादा मुलांवर असाव्यात, त्या त्यांना कशा समजावून द्याव्यात याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट असते. मुलांप्रति प्रेम व्यक्त करण्यातही त्यांची प्रगल्भता जाणवते. जगातली बहुतांश माणसं याच पद्धतीच्या माणसांमध्ये मोडतात.
 
अॅटचमेंट थिअरीनुसार लोकांचे प्रकार
अटॅचमेंट सिद्धांतानुसार आणखी दोन प्रकारची माणसं असतात. काही लोक दडपण घेतात, ते चिंतेत असतात. काही लोक टाळतात. जे लोक दडपण घेतात, ज्यांना काळजी वाटते ते बिलगतात, कवटाळतात.
 
बोलबाय-अँन्सवर्थ यांनी पालकांपासून दूर असलेल्या लहान मुलाच्या वर्तनाचा अभ्यास केला, त्यावेळी हे लक्षात आलं.
 
सिद्धांतानुसार या मुलांना पालकांचं प्रेम, जिव्हाळा नियमितपणे मिळालं असेलच असं नाही. काहीवेळेला ही मुलं लहानाची मोठी होत असताना पालक नव्हते असंही असू शकतं.
 
आपल्याकडे कधी लक्ष दिलं जाईल हे या मुलांना माहिती नसतं. त्यामुळे ही मुलं पालकांकडे प्रेमासाठी ओढा घेतात.
 
शेवटचा प्रकार म्हणजे टाळणं. ही मुलं पालकांप्रति फारसं प्रेम व्यक्त करत नाही. ते त्यांचं त्यांचं मन रिझवतात. कारण ते लहानाचे मोठे होत असताना आजूबाजूला पालक नसतातच. पालकांपासून दूर राहण्याचा स्वीकार करुन आपापल्या पद्धतीने ही मुलं आनंदाने जगतात.
 
ज्या पद्धतीने आपलं लहानपण जातं, जशी नाती होतात, लोकांशी बोलणं होतं त्यातून उर्वरित आयुष्यात आपण कशी नाती निर्माण करतो ते ठरतं.
 
समोरच्या माणसाकडून आपल्या काय अपेक्षा असतात ते ठरतं. प्रेमाचा साथीदार निवडण्यातही ते दिसून येतं. कसं प्रेम करतो यातही त्याची झलक दिसते.
 
आपण लोकांचं लक्ष वेधतो. कधी बोलून, कधी न बोलता. यात स्पर्श हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. जन्मापासून स्पर्शाची जाणीव महत्त्वाची असते. बाळाला आईचा स्पर्श कळतो. आईचा होणारा स्पर्श बाळासाठी मोलाचा असतो असं कारमायकेल सांगतात.
 
रडणाऱ्या मुलाला उचलून घेतलं, जवळ घेतलं की ते रडायचं थांबू लागतं. रडण्याच्या माध्यमातून ते आईला साद घालतं.
 
त्याला जे होतंय ते आईला सांगू पाहतं. आईवडिलांपैकी कोणी जवळ असेल तर बाळाला सुरक्षित वाटतं. स्पर्शाचं महत्त्व अँन्सवर्थ यांनी संशोधनाच्या माध्यमातून मांडलं.
 
जेव्हा तुम्ही माणसाला पाहू शकत नाही त्यावेळी भावना व्यक्त करण्याचा प्रयोग करण्यात आला. त्यावेळी लोकांनी स्पर्शाच्या माध्यमातून संवाद साधला. स्पर्श पुरेसा बोलका असतो. आपल्याला जे वाटतं ते समोरच्याला सांगण्याचं सगळ्यात प्रभावशाली माध्यम स्पर्शच आहे.
 
आपल्याला जे वाटतं आहे, जाणवतं आहे ते स्पर्शाद्वारे सांगता येतं. कारमायकेल यांना आढळून आलं की जेव्हा लोक अधिकाअधिक स्पर्शाचा उपयोग करतात तेव्हा त्यांच्या नात्याची वीण अधिक घट्ट आहे असं लोक सांगतात.
 
स्पर्शामुळे त्यांना एकमेकांशी एकरुप असल्यासारखं वाटतं. एकमेकांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येतं असं वाटतं.
 
साथीदार आपली काळजी घेतो असं वाटतं. एकूणत नातं अधिक दृढ होण्यादृष्टीने स्पर्शाची भूमिका परिणामकारक ठरते.
 
स्पर्शाचे फायदे
लहान मुलांना जसा स्पर्श हवा असतो तसा आपल्याला लागत नाही. पण स्पर्शाचे काही फायदे असतात. मानसिक त्रासाला सामोरं जात असलेल्या माणसाला प्रेमाच्या माणसाने आलिंगन दिलं किंवा पाठीवर थोपटलं तर त्या माणसाला बरं वाटतं.
 
स्पर्शामुळे जाणवणाऱ्या गोष्टी सगळ्यांना लागू होतात. काही माणसं मिठी, आलिंगन अशा गोष्टी टाळतात. अशी माणसं ठराविक लोकांशीच बोलताना मोकळेपणाने वागतात.
 
अशा लोकांनाही स्पर्शातून होणारे फायदे जाणवतात. प्रौढ लोकांच्या बाबतीत स्पर्शाचा संदर्भ बदलतो. लहानपणी पालकांनी कशा पद्धतीने त्याची जाणीव करुन दिली त्यावरही बरंच काही अवलंबून असतं. स्पर्शाची आवश्यकता सर्वांनाच असते. पण यातला फरक लक्षात घेणं आवश्यक आहे.
 
काही गोष्टी एकत्र येणं चांगलं नसतं. दोन चिंताक्रांत दडपणाखाली असलेल्या व्यक्तींनी एकत्र येणं योग्य नाही.
 
चिंतेत असलेला आणि माणसं टाळणारा व्यक्ती एकमेकांसमोर यायला नकोत. कारण चिंताग्रस्त माणसाला समोरच्याने लक्ष द्यावं असं वाटतं. टाळण्याचा स्वभाव असलेल्या व्यक्तीला अन्य माणसापासून दूर राहायला आवडतं.
 
आपण कुठल्या प्रकारात मोडतो हे लक्षात घेऊन आपल्याला कुठल्या स्वरुपाचा साथीदार हवा हे समजून घेणं आवश्यक आहे. तुमचं नातं समाधानकारक आहे का हेही समजून घेता येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिवाळी अधिवेशन: टीका नरेंद्र मोदींवर, ट्वीट सुब्रह्मण्यम स्वामींचं, दिलगिरी व्यक्त केली अमोल मिटकरींनी...