Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 18 March 2025
webdunia

जगू शकू का हो आपण पर्यावरणा विना?

जगू शकू का हो आपण पर्यावरणा विना?
, शनिवार, 5 जून 2021 (15:03 IST)
जगू शकू का हो आपण पर्यावरणा विना?
सुंदर आयुष्यास लागणारा हा परवाना,
नसतील गर्द हिरवाई आपले भोवती,
श्वास होतील महाग,कोण राहील सोबती?
जपावं लागेल आपल्यालाच हा खजिना,
उत्तरदायित्व आहे आपलं,जपणं ह्यांना,
समतोल आपल्याशी त्याचा योग्य साधावयास हवाय,
जपून पाऊल टाकण शिकायला हवंय!
चला होऊ आपण व्रतबद्ध ,करूया काही,
सूंदर पहाट उद्याची, आपली नक्कीच वाट पाही!
....अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2021 च्या नॉकआउट सामन्यांमध्ये मोठा बदल होऊ शकतो, BCCI लवकरच जाहीर करेल