Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छत्रपती संभाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे)

sambhaji raje
, शनिवार, 11 जून 2022 (08:20 IST)
छत्रपती शिवाजी महाराज-सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. रणांगणावरील मोहिमा  आणि राजकारणातील डावपेचांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज देखणे आणि शूर होते. ते अनेक भाषांत विाविशारद व धुरंदर राजकारणी होते.
 
राजकारणातील बारकावे त्यांनी आत्मसात केले होते. 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहानसहान बारकावे आणि  रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने रायगडावर आलेल्या  प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले. संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता.
 
संभाजीराजांनी राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. याप्राणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा उमटलेला आढळतो. अशा या शूर राजाचे 11 मार्च 1689 रोजी निधन झाले.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात भाजपच्या बॅनर्सवरून माजी महापौरच गायब!