Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोण होती राणी पद्मावती

कोण होती राणी पद्मावती
चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भंसालीद्वारे चित्तोडची महाराणी पद्मावतीचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप करत राजस्थानात राजपूत करणी सेनेने शूटिंगच्या सेटवर हल्ला केला. तेव्हा भंसाली जयपुरच्या जयगढ किल्ल्यात शूटिंग करत होते. करणी सेनेचा आरोप आहे की भंसालीने इतिहासात छेडछाड केली आहे.
 
तसेच पद्मावतीचं अस्तित्व होता की ते केवळ ऐक काल्पनिक पात्र होतो यावर प्रश्नच आहे. कोण होती पद्मावती आणि काय आहे तिची कहाणी पद्मावती संघलचे राजा गंधर्व सेन आणि राणी चंपावती यांची कन्या होती. मनमोहक आणि सौंदर्याची खाण इतकी सुंदर पद्मावतीच्या स्वयंवराचे आयोजन केले गेले तेव्हा तिने चित्तोडचे राजा रावल रतन सिंह यांच्या गळ्यात माळ घातली. राणी पद्मावती दिसण्यास अत्यंत सुंदर आणि मनमोहक होती त्यामुळेच दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीची वाईट नजर तिच्यावर पडली.  पद्मावतीच्या सौंदर्यावर भाळलेल्या अल्लाउद्दीन खिलजीनं थेट चित्तोड गाठले. पण चित्तोड किल्ल्याच्या तटबंदीने हैराण खिलजीने केवळ पद्मावतीचे मुखदर्शन करण्यासाठी खलिता पाठविला.
 
परपुरुषासमोर आपला चेहरा दाखवणं हा रजपुतांसाठी अपमान होता. पण युद्ध टाळण्यासाठी राजा रतनसिंह यांनी तो स्वीकार केला. आरशाद्वारे मुखदर्शनाची अट घालण्यात आली. पद्मावतीचे निखळ सौंदर्य पाहून खिलजी तिच्यावर फिदा झाला. त्याचा इरादा बदलला आणि राजा रतन सिंहला कैद केले. जोपर्यंत पद्मावती शरण येत नाही तोपर्यत राजाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. तेव्हा राणी आणि सैनिकांनी मिळून अट ठेवली की राणी आपल्यासोबत 700 दासी घेऊन येईल. खिलजी तयार झाला.
 
दुसर्‍या दिवशी पालख्या बघून खिलजी खूश झाला परंतू त्यातून राणीऐवजी सैनिक भरलेले होते. त्यांनी खिलजीच्या छावणीवर हल्ला केला आणि राजाची सुटका करवली.
 
अपमानित खिलजीने युद्ध छेडले आणि या लढाईत चित्तोडचे अनेक सैनिक मारले गेले. युद्धात राजा रतनसिंह यांचाही मृत्यू झाला. चित्तोडचा अभेद्य किल्ला मुघलांनी भेदला. पण मुघलांच्या हाती लागण्यापेक्षा किल्ल्यातल्या स्त्रियांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. राणी पद्मावतीने किल्ल्याच्या आत चितेत उडीत घेण्याचा निर्णय घेतला. स्त्रियांना बंदी बनवण्यास खिलजीने किल्ल्यात प्रवेश करताच राणी पद्मावती यांच्यासह जवळपास 16 हजार महिलांनी सामूहिक चितेमध्ये उडी घेतली. सतीच्या या प्रकारालाच राजस्थानमध्ये जोहार म्हणतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'गो एअर' ची प्रजासत्ताक स्पेशल ऑफर