Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 17 March 2025
webdunia

अश्वाप्रमाणे उडी मारते ही गाय

अश्वाप्रमाणे उडी मारते ही गाय
न्यूझीलंडमधील एका मुलीने घोडा पाळण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे निराश न होता गायीलाच घोडा बनविले आहे. सात वर्षे तिने या गायीला शर्यतीतील अश्‍वांप्रमाणे अडथळ्यांवरून उड्या मारण्याचे प्रशिक्षण दिले असून ही गाय सध्याच्या घडीला घोड्यालाही लाजवेल, अशा उड्या मारते.
 
साऊथलँड भागातील डेअरी फार्ममध्ये काम करणार्‍या हन्नाह सिम्पसनची ही अनोखी कहाणी आहे. घोडा आणि घोडेस्वारी हन्नाहला आवडते. 
 
अडथळे पार करत धावणार्‍या घोड्यांचे आकर्षण असल्यामुळे तिने घरच्यांकडे घोडा घेऊन देण्याचा हट्ट धरला. तथापि, पालकांनी घोडा घेणे आवाक्याबाहेर असल्याचे सांगून, तिचा हट्ट पुरविण्यास नकार दिला. यामुळे हन्नाह हिरमुसली. मात्र, नाउमेद झाली नाही. आपल्या डेअरी फार्ममधील लिलॅक या गायीलाच तिने घोडा बनवून तिच्यावरून रपेट मारणे सुरू केले. हन्नाह ही तेव्हा ११ वर्षांची होती. तिने लिलॅकला घोड्याप्रमाणे धावण्याचे, तसेच अडथळ्यांवरून उड्या मारण्याचे सलग सात वर्षे प्रशिक्षण दिले.
 
 शहरातील कोणत्याही अश्‍वाशी स्पर्धा केल्यास लिलॅक कुठेही कमी पडणार नाही, अशा रीतीने तिने गायीला तयार केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युवकांनी स्वामी विवेकानंद विचारांपासून प्रेरणा घ्यावी –डॉ. भोंडे