Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

द्विभाषी लोकांना डिमेन्शियाची भीती कमी असते

द्विभाषी लोकांना डिमेन्शियाची भीती कमी असते
द्विभाषी लोकांची बौद्धिक क्षमता चांगली असल्यामुळे या लोकांना वयोमानाने येणारा विसरभोळेपणा किंवा डिमेन्शिया होण्याची शक्यता कमी असते. कॅनडा येथील मॉन्ट्रियल विद्यापीठात झालेल्या संशोधनात एकभाषी व द्विभाषी लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला आहे.
 
अनेक वर्ष दोन भाषा बोलणार्‍या लोकांच्या मेंदूला एकावेळी एका माहितीवर लक्ष देऊन दुसर्‍या माहितीने विचलित न होण्याची सवय झालेली असते. यामुळे मेंदू अधिक कार्यक्षम बनतो. द्विभाषी लोकांमध्ये अधिक ‍केंद्रीय व विशेष कार्यात्मक कनेक्शन असतात.
 
एकभाषी लोकांच्या मेंदूमध्ये तेच काम करण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीची वैविध्यपूर्ण संरचना असते. मेंदूचा पुढचा भाग जास्त वापरणार्‍यांना डिमेन्शिया होण्याची अधिक शक्यता असते. द्विभाषी लोक हा भाग कमी वापरत असल्यामुळे त्यांना डिमेनिश्या होण्याची भीती कमी असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ती १२ अँड्राईड अॅप्लिकेशन्स हटवा, सरकारकडून गुगलला सूचना