ऑस्ट्रेलियातील काही लोकांनी कब्रस्तानाची ही मनातील प्रतिमा बदलण्याचे ठरवले आहे. तेथील अॅडलेडमध्ये ‘वेस्ट टॅरेस’ नावाचे कब्रस्तान आहे. आता त्याचे रूपांतर एका पिकनिक स्पॉटमध्ये केले जात आहे. याठिकाणी संगीत कार्यक्रम आणि डिनर पार्टीचेही आयोजन केले जात आहे.
याठिकाणी सध्या शेकडो वर्षांपूर्वीच्या झाडांपासून बनवलेले ऑलिव्ह ऑईलही विकले जात आहे. कब्रस्तानाच्या 180 व्या वर्धापनदिनानिमित्त ते खास बनवण्यात आले आहे. ते खरेदी करण्यासाठी म्हणूनही अनेक लोक कब्रस्तानात येत आहेत. हे ठिकाण आता अधिक हिरवेगार बनवले जात आहे.
लोकांना आकर्षित करण्यासारख्या सर्व वस्तू, खाण्यापिण्याचे सामान इथे ठेवले आहे. हे कब्रस्तान आता केवळ मृतांचे नव्हे तर जिवंत लोकांचेही ठिकाण बनत चालले आहेण तिथे अनेक प्रदर्शने, बाईक रेसिंगसारखे कार्यक्रमही आहेत. कब्रस्तानाची देखभाल करणारा विभाग इथे खास डिनर समारंभही आयोजित करतो.