Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची सहावी पुण्यतिथी

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची सहावी पुण्यतिथी
, गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (10:33 IST)
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज सहावी जयंती. २० ऑगस्ट २०१३ रोजी मॉर्निंग वॉकसाठी जात असताना ओंकारेश्वर पुलावर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. गोळी झाडणारे दोन हत्याखोर दुचाकीवरुन पसार झाले. तेव्हापासून आजतायगत त्या मारेकऱ्यांचा तपास लागलेला नाही, शिक्षा तर फार लांबची गोष्ट आहे. आज सहा वर्ष निघून गेले. मात्र अद्यापही डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी मोकाट फिरत आहेत. उलट दाभोलकरांनंतरही कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांची देखील दाभोलकरांसारखी हत्या करण्यात आली. त्यामुळे हे मारेकरी प्रचंड शेफारले आहेत. दाभोलकरांना न्याय मिळावा यासाठी शेकडो नागरिकांनी आंदोलने केले. मात्र, दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अध्यापही शिक्षा झालेली नाही. दाभोलकरांना न्याय मिळावा यासाठी आजही देशभरात आंदोलने केले जात आहेत. मात्र, अजूनही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना न्याय मिळताना दिसत नाही.
 
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सध्या सीबीआय करत आहे. पोलिसांनी केलेला तपास, त्यानंतर पोलिसांवरही नाराज झालेली जनता आणि सीबीआयकडून होणार तपास या सगळ्या गुंत्यात अद्यापही दाभोलकरांचे मारेकरी पकडण्यात आलेले नाहीत. याशिवाय जे पकडले आहेत, त्यांनी खरच हत्या केली आहे, हे उघडपणे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे देशभरातून तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मनिष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना मुंब्रा येथून अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ सापडलेले पिस्तूल हे दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आल्याचे संशय आहे. सध्या ते पिस्तूल फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तपास पथके रग्गड कामाला लागली आहेत. १० जून २०१६ रोजी पोलिसांनी सनातनच्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली. त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल झाले होते. या आरोपपत्रात हत्येचा कट रचणे आणि हत्या करणे असा आरोप करण्यात आला होता. ऑगस्ट २०१८ ला सीबीआयने सचिन अंदुरे, शरद कळसकर, अमित दिगवेकर, अमोल काळे, राजेश बंगेरा यांना अटक केली. यामधील सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या विरोधात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले.
 
सध्या उच्च न्यायालयात प्रकरण सुरु आहे. आरोपी शरद कळसकरला त्याचेच वकील अॅड. संजीव पुनाळेकर यांनीच पिस्तूल नष्ट करण्याचा सल्ला दिला असल्याचा जबाब कळसकर याने कर्नाटक पोलिसांना दिला होता. त्यानुसार सीबीआयने अॅड. पुनाळेकर आणि त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या विक्रम भावेला अटक केली. अॅड. पुनाळेकर यांची सूटका झाली तर विक्रम भावेचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Humanitarian Day : जागतिक मानवतावादी दिवस 2021