Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉस अनेकदा रडवतो

बॉस अनेकदा रडवतो
जर आपण नोकरीत असाल तरी ही बातमी आपल्यासाठी आहे. एका शोधात उघडकीस आले आहे की दहामधून आठ लोकं नोकरी करताना ऑफिसमध्ये बॉसमुळे रडतात. या सर्व्हेप्रमाणे नोकरीत बॉसमुळे कर्मचार्‍यांच्या डोळ्यातून अनेकदा अश्रू बाहेर पडतात. अनेक लोकांनी स्वीकार केले की दररोज बॉसच्या अराडा ओरडामुळे आठवड्यातून एकदा तरी रडण्याची परिस्थिती निर्माण होते. 
 
इतर लोकांप्रमाणे ऑफिसमध्ये कामाच्या दबावामुळे, खाजगी जीवनातील समस्या कधी-कधी रडकुंडी येते. अर्थात खाजगी जीवनात सुरू असलेल्या समस्या त्यावर ऑफिसच्या कामांची भर पडते तेव्हा निराशा वाटू लागते.
अनेक लोकांचे म्हणणे होते की केवळ बॉसच नव्हे तर इतर फिलिंग्समुळे डोळ्यात अश्रू वाहू लागतात. त्याची वागणून सहन होत नसल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते.
 
सर्व्हेत भाग घेणार्‍या लोकांनी स्वीकारले की ऑफिसमध्ये बुलिंगमुळे अनेकदा ते परेशान होऊन रडू लागतात. काही लोकं क्लाइंटमुळे किंवा कामा काही चूक घडल्यामुळे रडतात. कमजोर मानसिक स्थिती देखील यासाठी कारणीभूत ठरते. अनेकदा मानसिक आरोग्य योग्य नसल्यास लोकांच्या कामाची गती हळू होते आणि ते सुट्ट्या देखील अधिक घेतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिलेने घरावर काढवल्या इमोजी, शेजारीण म्हणाली- मला चिडवण्यासाठी असे केले