Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Environment Day 2020 : पर्यावरण निरोगी ठेवण्यासाठी 10 गोष्टी, निसर्ग आणि हिरवळीचे 10 लाभ

Environment Day 2020 : पर्यावरण निरोगी ठेवण्यासाठी 10 गोष्टी, निसर्ग आणि हिरवळीचे 10 लाभ
, शुक्रवार, 5 जून 2020 (07:00 IST)
निसर्ग मूक, सहनशील आणि गंभीर आहे परंतू अती छेडछाड निसर्गाला देखील पटत नाही. निसर्गाची सहनशीलता आणि धैर्य कमजोरी समजण्याची चूक आम्ही वर्षांपासून करत आहोत परंतू लक्षात ठेवा की निसर्ग लाचार नाही, निसर्ग न्याय नक्की करतं. निसर्गाची न्याय प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. कुठे पूर तर कुठे कोरडं, कधी ज्वालामुखी तर कधी भूकंप. याला निसर्गाचा इशारा समजून क्षमायाचना प्रारंभ करायला हवी. पुन्हा हिरवळ भेट म्हणून दिल्यावर शक्य आहे की निसर्ग आम्हाला क्षमा करेल.  
 
पर्यावरणाला निरोगी, स्वच्छ ठेवण्यासाठी, निसर्ग व्यवस्थापन घटक पाणी, वायू, वसुधा आणि आकाश यांच्या देणं-घेणं यात सहायक बनून त्यांच्या संरक्षणात नारीची भूमिका महत्त्वाची ठरू शकते कारण नारी स्वत: संवेदनशील, समजूतदार, दूरदर्शी आणि स्नेह प्रेमाची मूर्ती असते. आई, बहीण, मुलगी किंवा पत्नी या रूपात स्त्री आपल्या मुलांची,  भावांची, वडिलाची, पतीची सर्वात मोठी हिंतचितंक असते आणि सोबतच ती निसर्गाच्या शोषणाची वेदना योग्य प्रकारे समजू शकते. म्हणूनच ती प्रत्येक व्यक्तीला पर्यावरण आणि निसर्ग संरक्षणाचे संस्कार सोप्यारीत्या शिकवू शकते.  
 
आज गरज आहे की लोकांमध्ये पर्यावरणाप्रती संवेदना जागृत होण्याची, निसर्गाची जुळण्याची तेव्हाच पर्यावरणाला दूषित करणार्‍यांविरुद्ध आक्रोश निर्माण होईल आणि आम्ही स्वप्रेरणेने स्व:हितासाठी प्रयत्न करू.  
 
1. आपल्या आवडीच्या लोकांना आनंदी ठेवण्यासाठी आम्ही त्यांना भेटवस्तू देत असतो त्याच प्रकारे निसर्गाला हिरवळ परत देण्याचा प्रयत्न करायला हवा. अधिकाधिक झाडे रोपून त्यांचे संरक्षण करायला हवे.  
 
2. पाण्याचं अपव्यय थांबावयाला हवा.
 
3. पेट्रोल इतर इंधनाचे योग्यरीत्या वापर करून "पूल-कार" ची सवय घालावी.  
 
4. आपल्या घर- अंगणात झाडांसह पशू-पक्ष्यांसाठी दाणा-पाणी ठेवावे.  
 
5. आपल्या कचरा कुठेही न पसरवता आजार रोखण्यात मदत करावी. स्वच्छ आणि निरोगी कॉलोनी बनवण्यात सहयोग करून आपलं शहर सुंदर होईल याची जबाबदारी घ्यावी.
 
6. विविध प्रसंगी लोकांना रोपं भेट म्हणून द्यावे.  
 
7. प्राकृतिक संपदांचे मोल समजावे. पाणी, वीज, गॅस, पेट्रोल, आवश्यक तेवढेच वापरावे.
 
8. आधुनिकता दिसायचे असल्यास पर्यावरण प्रती जागरूक होऊन याचे प्रमाण द्यावे.  
 
9. पॉलिथिनचा वापर पूर्णपणे टाळावा आणि बाजारात जाताना स्वत:ची पिशवी न्यावी.
 
10. सोबत जेवायला बसावे ज्याने विजेची खपत कमी होईल सोबतच संबंध सुधारतील.
 
निसर्गापासून लाभ-
 
1. सुंदर फुलं, हिरवी गवत आणि झाडांवर मधुर आवाज काढणार्‍या चिमण्या मनात सकारात्मक ऊर्जा भरून कार्यक्षमतेला वाढवतात.
 
2. झाडं तसेच रंगीबेरंगी फुलं, त्यांचा सुगंध, वार्‍याचा झोका मनातील सर्व ताण दूर करून मन प्रसन्न ठेवण्यास मदत करतं.  
 
3. निसर्गाची जवळ असल्याने ईश्वराप्रती आस्था जागृत होते. याने अहं भाव संपून जीवन सरळ होतं.  
 
4. झाडांवर उमगणारे फुलं नवीन जीवनाच्या नवीन आशांना जन्म देतात आणि सर्व काळजी, ताण आणि समस्या दूर करण्यास मदत होते.  
 
5. शुद्ध वार्‍याने स्वस्थ राहून प्रसन्न राहता येतं.
 
6. झाडांसोबत आपोआप लगाव आणि त्यामुळे प्रेम आणि विश्वासात वाढ होते ज्यामुळे नात्यांमधील गोडवा गडद होतो.
 
7. झाडांना दिलेलं पाणी पुनः: पावसाच्या रूपात परत येतं ज्याने पाण्याचं स्तर वाढतं.  
 
8. हिरव्या गवतीमध्ये बसण्याचा आनंद, उन्हाळ्यात गार वारं, हिवाळ्यात ऊनात बसण्याची मजा आणि फुलांचे विविध रंग खर्‍या सुखाची जाणीव करून देतात.  
 
9. या मूक झाडांप्रती समर्पित भाव आमच्यात स्वार्थ, कपट, बैर सारख्या भावना नाहीश्या करण्यात सक्षम असतात.  
 
10. झाडांची रोपण करून आम्ही सृजन सुख अनुभव करतो. याने प्रकृती प्रबंधन, पाणी आणि पर्यावरणाचे संरक्षण करून आम्ही भावी पिढ्यांना निरोगी राहण्यासाठी नवीन मार्ग दाखवतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Kabir Das Jayanti 2020 : संत कबीर दासांच्या संयमाची रोचक कथा