Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाशी निगडित 10 गोष्टी

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाशी निगडित 10 गोष्टी
1. ज्योतिबा फुले महान क्रांतिकारी, भारतीय विचारक, समाजसेवी, लेखक व दार्शनिक होते. यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली पुण्यात झाला होता.
 
2. ज्योतिबा यांचा पूर्ण कुटुंब फुलांचे गजरे बनवण्याचे काम करीत होते यामुळे त्यांच्या कुटुंबाला फुले या नावाने ओळखले जात असे. ज्‍योतिबा केवळ एक वर्षाचे असताना त्यांच्या आईचे देहांत झाले होते.
 
3. ज्‍योतिबा फुले यांनी काही काळ मराठीत अभ्यास केला नंतर शिक्षण सुटलं आणि नंतर वयाच्या 21 वर्षात त्यांनी इंग्रजीत सातवी या वर्गाचा अभ्यास सुरू केला.
 
4. महात्मा फुले यांचा विवाह 1840 साली सावित्री बाई यांच्यासोबत संपन्न झाला होता.
 
5.  स्त्रियांची अवस्था सुधारण्यासाठी आणि समाजात त्यांना ओळख प्रदान करण्यासाठी त्यांनी 1854 मध्ये एक शाळा उघडली. ही शाळा देशातील पहिली अशी शाळा होती जी मुलींसाठी उघडण्यात आली होती. मुलींना शिक्षण 
 
देण्यासाठी शिक्षिका नसल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला या योग्य बनवले. काही लोकांना सुरुवातीपासूनच त्यांच्या कामात अडथळे घातले. लोकांनी त्यांच्या वडिलांवर दबाव टाकून त्यांना पत्नीसह घरातून बाहेर हाकवले तरी 
 
ज्‍योतिबाने हिंमत सोडली नाही आणि मुलींसाठी तीन-तीन शाळा उघडल्या. 
 
6. गरीब आणि निर्बल वर्गाला न्याय देण्यासाठी ज्योतिबाने 'सत्यशोधक समाज' स्थापित केले, त्यांच्या समाज सेवेने प्रभावित होऊन 1888 मध्ये मुंबईच्या एक सभेत त्यांना 'महात्मा' या उपाधीने अलंकृत करण्यात आले.
 
7. ज्योतिबा यांनी ब्राह्मण-पुरोहित यांच्या मदतीविना विवाह-संस्कार आरंभ करवले आणि मुंबई हायकोर्टाकडून मान्यता मिळवली. ते बाल-विवाह विरोधी आणि विधवा-विवाहाचे समर्थक होते. 
 
8. त्यांनी दलितांच्या प्रगतीसाठी अनेक कार्य केले. त्यांनी दलित मुलांचे घरात पालन-पोषण केले. परिणामस्वरूप ते जातीतून बहिष्कृत केले गेले.
 
9. ज्योतिबा फुले आणि त्यांचं संघटन सत्‍यशोधक समाजाच्या संघर्षामुळे सरकाराने एग्रीकल्‍चर एक्‍ट पास केले.
 
10. महात्मा ज्‍योतिबा फुले यांनी वयाच्या 63 व्या वर्षी 28 नोव्हेंबर 1890 ला पुण्यात आपले प्राण त्यागले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चोर चोर चोर...