Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 16 April 2025
webdunia

तो बाप असतो

मराठीत बाप
, शुक्रवार, 14 जून 2019 (14:08 IST)
बाळंतपण झाल्यावर, धावपळ करतो
औषध घेतो, चहा, कॉफी आणतो
पैशांची जुळवाजुळव करतो
.................... तो बाप असतो
 
सगळ्यांना ने आण करतो
स्वयंपाक हि करतो
सिजरीन नंतर बायकोला त्रास नको,
म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो
.................................. तो बाप असतो
 
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातपाय पडतो
................................. तो बाप असतो
 
कॉलेज मध्ये सोबत जातो, हॉस्टेल शोधतो
स्वतः फाटक बनियन घालून
तुम्हाला jeans ची pantघेऊन देतो
.................................... तो बाप असतो
 
स्वतः टपरा mobile वापरून, तुम्हाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
.................................... तो बाप असतो
 
lovemarriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो
"सगळं नीट पाहिलं का? " म्हणून खूप ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस ऐकल्यावर खूप रडतो
................ तो बाप असतो
 
जाताना पोरगी सासरी, धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
.............. तो बाप असतो.
 
स्त्रोत : प्रियंका विजय

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्यथा : एका वृद्ध पित्याची..