Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खारीच्या उडणार्‍या प्रजातीचा शोध

खारीच्या उडणार्‍या प्रजातीचा शोध
उत्तर अमेरिकेमध्ये शास्त्रज्ञांना उडणार्‍या खारूताईच्या एका नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. ही खार शेकडो वर्षांपासून नजरेआड होती. हम्बोल्ट्स वा ग्लुकोमीस ओरेगोन्सिस नावाने ओळखल्या जाणार्‍या या अनोख्या वैशिष्टांच्या खारीचे उत्तर अमेरिकेतील प्रशांत महासागराच्या किनार्‍यावर वास्तव्य आहे.
 
वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्राध्यापक जीम केनाजी यांनी सांगितले की मायटोर्कोड्रियल डीएनएमध्ये शास्त्रज्ञांना आण्विक जिनोम दिसेपर्यंत गेली 200 वर्षे वायव्य अमेरिकेत उडणार्‍या खारीची केवळ एकच प्रजात असल्याचे समजले जात होते. हे एक आश्चर्यकारक संशोधन आहे. उडणारी हम्बोल्ट्स खार एक गुप्त प्रजात समजली जाते.
 
ही प्रजात पूर्वी अन्य प्रजातीच्या रूपात ओळखली जात होती. कारण दोन्ही दिसायला एकसारख्या आहेत. या नव्या हम्बोल्ट्स खारीचा शोध जगातील खारीची 45 वी प्रजात समजली जात आहे. उत्तर व मध्य अमेरिकेमध्ये उडणार्‍या खारीच्या दोन प्रजाती आहेत. त्या सगळ्या छोट्या असून त्यांचा जंगलांमध्ये वावर असतो.
 
या खारी वास्तवात वटवाघुळे वा पक्षांप्रमाणे उडत नाहीत. त्याऐवजी आपल्या केसाळ त्वचेचा पडदा पसरवून या झाडावरून त्या झाडावर जातात. त्यांची पंखासारखी शेपटी पुढे सरकण्यास व वळण घेण्यासही मदत करते. या खारीची सरकत जाण्याची क्षमता विलक्षण असून ती शंभर मीटरपर्यंत वेगाने सरकत जाऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Father's Day Special : पिढीजात अंतर असणारच!