Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वर्‍हाडींना मिळाले हेल्मेट गिफ्ट!

वर्‍हाडींना मिळाले हेल्मेट गिफ्ट!
मानपान आणि बडेजाव बाजूला ठेवून एका विवाहाच्या स्वागत समारंभात आलेल्या पाहुणे मंडळींना चक्क हेल्मेट वाटप करण्यात आले.
 
 नाशिक शहरात रंगलेला हा छोटेखानी स्वागत समारंभाचा सोहळा चर्चेचा विषय ठरला. डॉ राजेंद्र आणि मायादेवी साबद्रा यांची कन्या प्रियदर्शना आणि नाशिकामधील उद्योजक हरीश आणि वंदना गोगड यांचा मुलगा ऋषभ यांनी 19 एप्रिल रोजी रजिस्टर पद्धतीने विवाह केला.
 
जवळचे नातलग आणि स्नेहीजनांसाठी गंगापूर रोडलगतच्या एका लॉन्समध्ये स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण सोहळ्यालाच सामाजिक बांधिलकी लाभल्याने हा सोहळा आगळावेगळा ठरला. जैन समाजात विवाह सोहळ्यांवर वारेमाप खर्च केला जात असला तरी वर आणि वधूकडील मंडळींनी या खर्चाला फाटा देऊन तो पैसा सामाजिक कार्यासाठी देऊ केला.
 
या विवाह सोहळ्यात लग्नपत्रिकेचा खर्च टाळण्यात आला. निमंत्रितांना व्हॉट्स अॅपद्वारेच निमंत्रण पाठविण्यात आले. भूज भूकंपग्रस्तांसाठी काम करणार्‍या पन्नालाल सुराणा यांच्या आपले घर या सामाजिक संस्थेत सध्या 268 मुले-मुली आहेत. त्यापैकी चार मुलींच्या लग्नाचा खर्च या लग्नात ‍वाचविलेल्या पैश्यातून करण्यात येईल.
 
तसेच स्वागत समारंभात आलेल्या 500 निमंत्रितांना हेल्मेटचा वाटप करण्यात आले. समारंभात कोणतेही गोड पदार्थ न ठेवता शेतकर्‍यांकडून खरेदी केलेल्या द्राक्षाच्या पेट्या निमंत्रितांना वाटण्यात आल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एन्काउंटर केले नसते तर आज मोदी जिवंत नसते: वंजारा यांचा दावा