Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सणासुदीला अधिक प्रमाणात गोड, तेलकट खाल्याने कशाप्रकारे यकृतावर परिणाम होतो?

liver
, बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (19:04 IST)
डॉ. अमोल डहाळे, सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हेपॅटोलॉजिस्ट, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे
liver
लिव्हर म्हणजे यकृत हा शरीराचा एक अतिशय महत्वाचा अवयव आहे. म्हणूनच तर आपल्याड सर्वात लाडक्या व्याकरीला 'जिगर का तुकडा' म्हटले जाते. या वाक्प्रचार जिगर म्हणजे लिव्हर/ यकृत हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित नसते. यकृत हे हृदय, मेंदू, किडनी या अवयवांसारखे महत्वाचे असते, म्हणजेच त्याशिवाय आपण जगू शकत नाही. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे यकृताच्या विकारांचे विकारांचे प्रमाण वाढत आहे. यात सगळ्यात जास्त आढळणारा आजार म्हणजे फॅटी लिव्हर. 
 
सर्वसाधारणपणे शरीरातील चरबी लिव्हर मधून कार्यान्वयीत होते. पण फक्त पाच टक्के चरबी लिव्हरमध्ये साठवून ठेवली जाते.  यापेक्षा जास्त चरबी लिव्हरमध्ये साठवून गेली तर त्याला 'फॅटी लिव्हर' असे म्हटले जाते. हि या जाराची सुरुवात असते. जस-जसे प्रमाण प्रमाण वाढत जाते, तसे यकृताला इजा होण्यास सुरुवात होते. पुढील टप्प्यांमध्ये इंफ्लेमेशन (स्टिएटोहेपाटायटिस), नंतर फायब्रोसिस आणि त्यानंतर कायमस्वरूपी लिव्हर डॅमेज म्हणजेच सिऱ्होसिस होऊ शकते. यामुळे आपल्या जीवनशैलीकडे विशेषतः खाण्याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.
 
फॅटी लिव्हर हा फक्त तेलकट, तुपकट पदार्थ खाल्यामुळे होतो हे अर्धसत्य आहे. फॅटी लिव्हरचे सर्वात मुख्य कारण हे जास्त कॅलरी युक्त पदार्थ खाल्यामुळे होते. मानवी शरीरात सर्व प्रकारच्या कॅलरी या शेवटी चरबीमध्ये (फॅट) परिवर्तित केल्या जातात आणि कमी जागेत जास्त साठा करता येत असल्यामुळे याच स्वरूपात संवर्धित केल्या जातात पण एका प्रमाणाच्या पलीकडे त्या शरीराला आणि लिव्हरला इजा करतात.
 
आता सध्या सणासुदीचे दिवस आहेत आता गणपती नंतर दसरा, दिवाळी असे सणवार चालू होतील. म्हणजे गोडधोड आणि चमचमीत पदार्थांची रेलचेल असेल. आजकाल अशा गोड पदार्थांची सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्धता असल्यामुळे साहजिकच आपल्याकडून त्यांचे अधिक प्रमाणात सेवन होते.
पण आपल्याला सण, जीवनशैली आणि अर्थात जिवनशैली याचा मेळ साधता आला पाहिजे. मिठाई बिनसाखरेची आणि नैसर्गिक पदार्थापासून बनवलेली असेल तर चांगली, पण तरीही ती मिठाई सारखीच खावी अधिक खाऊ नये. पुढे किंवा मोदकांपेक्षा पारंपरिक मोदक कधीही चांगलेच! दुधाच्या आणि मैद्याच्या पदार्थापेक्षा, तृणधान्यापासून बनवलेले पक्वान्न कधीही उत्तम.
यकृत हा शरीराचा एक मूकपणे काम करणारा संरक्षक अवयव आहे. म्हणून त्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा 'यकृत सदृढ, तर तुम्ही सदृढ.’

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाळवीने खाल्ले 18 लाख रुपये!