Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इमोशनल बँक अकाउंट, आपल्या श्रीमंतीचा हिशोब लावा

इमोशनल बँक अकाउंट, आपल्या श्रीमंतीचा हिशोब लावा

राजश्री दिघे चितले

, सोमवार, 20 एप्रिल 2020 (15:54 IST)
पॉझिटिव्ह आस्पेक्ट म्हणजेच सकारात्मक दृष्टिकोन. विषय हाच सध्या चा.... लॉक डाउन असताना कशी काय पॉझिटिव्हीटी जागी ठेवायची. काल एका स्नेही बरोबर हीच चर्चा सुरू असताना लक्षात आले हे घरी घरी म्हणतात सारेच पण किती ते फायद्याचं ठरेल बघा हे घरी राहणे !!.....
 
तर कसे ?? 
सध्या किती काळजी आहे साऱ्यांनाच इकॉनॉमी, फायनान्स म्हणजेच कालांतराने अर्थव्यवस्था कशी बघणार आहे आपल्या कडे....!!! तर लक्षात घ्या सध्या घरीच आहोत तर श्रीमंती केवढी आहे ते बघा. भावनांची बँक आहोत आपण आणि प्रत्येकाचं खातं आहे त्यात. अहो ही एक वेगळीच विचारधारा आहे का काय असा प्रश्न पडेल. पण नाही वर्षानुवर्ष आपण ते खातं चालवतोय. इमोशनल बँक अकाउंट असे म्हणतात त्याला. आता नक्की ही बँक म्हणजे काय हे खाते काय तर हे समजले की वेगळी मज्जा.
 
आयुष्यात किती तरी जवळची माणसं, तर काही ठीक ठीक आणि काही नकोच असलेली. आता या प्रत्येकाबरोबर आपले एक वेगळे इमोशनल अकाउंट. नात्यात आनंद, हसणे, खिदळणे, प्रेम आले किंवा मिळत राहिले, दिले की खात्यात भावना जमा झाल्या. व्याज म्हणजे सुंदर आठवणी. आता एखादं वेळी नात्यात रुसवा फुगवा, चिडचिड, भांडणे आली तर समजा भावना डेबिट केल्या. बँकेतील अकाउंट कसे जिरो म्हणजे शून्य बॅलन्स करून चालत नाही तसेच ह्या अकाउंट मध्येही ते लक्ष द्यायचे. किती ही कटू भावना आल्या, अपशब्द आले, मतभेद झाले तरी मनभेद होतील आणि खातं रिकामं होईल असे करायचे नाही. इथे दुःखाची, अश्रूंची, दुराव्याची पेनल्टी लागते. आणि मग नव्याने सुरवाती पासून ओळख पत्र दाखवून खातं उघडावे लागते. त्यात मग बँकेचे नियम बदल झाले आणि अकाउंट उघडण्यावर बंदी आली तर....????
 
आतापर्यंत लक्षात आले असेल हा सगळा प्रवास कुठल्या दिशेने सुरू आहे. तर हा लॉकडाउनचा काळ जरी अर्थव्यवस्थेची गती मंद करत असला तरी भावनांची बँक सुरू आहे. भरघोस भावना ह्यात डिपॉझिट करा. म्हणजे नक्की काय करायचे...!!! तर ह्या उत्तम डिजीटल युगात मित्र मंडळींशी बोलत असालच, भरपूर संदेश पोहचवले जात असतीलच....ते क्रेडिट. घरी असणाऱ्या लहान मंडळी सोबत वेळ घालवला त्यांना नवीन काही जे तुमच्या लहानपणी चे जुने बरं का सांगून बघा. अकाउंट मध्ये डिपॉझिट.....घर कामाची वाटणी महिला वर्ग अगदी प्रेमाने हुरळून जाईल ....अकाउंट मध्ये क्रेडिट.....गाणी म्हणणे नाचणे, जुन्या आठवणी, पाक कला, सोबत बघितलेला टीव्ही सारे काही क्रेडिट. हो मधून अधून थोडे खटके उडाले जरी तरी डेबिट काही फार होणार नाही. कारण सतत घरी असल्यामुळे क्रेडिट सुरू आहेच. लक्षात घ्या हा लॉक डाउन एवढे डिपॉझिट करून गेला पाहिजे की नंतर कधी मतभेदातून डेबिट झालेच तरी बॅलन्स जिरो होणार नाही हे नक्की. 
 
असू म्हणू शकू ना आपण पैशांनी भरत होतो जे खातं त्याची गती जरी संथ वाटत असेल सध्या तर या रोगराईमुळे भावनांचं खातं झपाट्याने भरेल. बघा बरं तो देव बाप्पा पण किती तरी एक्सट्रा वेळ देतोय खातं भरायला. मग चला हृदयाच्या बँकांतील आपला भावनांचा अकाउंट इतका परिपूर्ण करूया की छोट्या मोठ्या येणाऱ्या संकट समयी जरी डेबिट झाले तरी खातं रिकामे होणार नाही आणि आयुष्य श्रीमंतीत जाईल. तर सगळेच कोट्यधीश व्हावे ही सदिच्छा.....!!!!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये, सीयडी कसून तपास करीत आहे- उद्धव ठाकरे