Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

International Dance Day आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे महत्त्व

International Dance Day आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे महत्त्व
, गुरूवार, 29 एप्रिल 2021 (11:27 IST)
दर वर्षी 29 एप्रिल रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा केला जातो. 1982 पासून हा दिन साजरा करण्यात येतो. नृत्याच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करणे आणि नृत्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा या दिनाचा मुख्य हेतू आहे. महान नृत्यांगना जीन जार्ज नावेरे यांच्या वाढदिवशी त्यांच्या स्मृतीत हा उत्सव साजरा केला जातो. 
 
नृत्य जगात ते सुधारक म्हणून ओळखला जातात. भारतात देखील नृत्य परंपरा शतके जुनी आहे. असे म्हणतात की नृत्याची उत्पत्ती त्रेता युगात झाली होती. सध्या भारतात बरीच प्रसिद्ध नृत्ये आहेत, त्यापैकी भरतनाट्यम, ओडिसी, कुचीपुडी, कथकली, मोहिनीअट्टम, कथक इत्यादी प्रमुख आहेत.
 
आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचा इतिहास
यूनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय थिएटर संस्थेची आंतरराष्ट्रीय नृत्य समितीने 29 एप्रिल 1982 रोजी आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे नृत्य जगातील सुधारक मानल्या जाणार्‍या महान नर्तक जीन जॉर्ज नावेरे यांचा वाढदिवस आहे. 29 एप्रिल रोजी नावेरे यांचा जन्म झाला होता म्हणून दर वर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा केला जातो. नावेरे यांनी नृत्यावर पुस्तक देखील लिहिले होते, ज्याचं नाव 'लेटर्स ऑन द डांस' आहे. या पुस्तकात नृत्य कलेच्या सर्व युक्त्या शिकवल्या गेल्या आहेत, ज्याद्वारे लोक करु शकतात किंवा नृत्य मध्ये प्रवीणता प्राप्त करू शकता.
 
आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे महत्त्व
या दिवशी, जगभरात नृत्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे संपूर्ण जगात लॉकडाउनची परिस्थिती आहे. अशात लोक आपल्या घरात उत्सव साजरा करत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत एकमेकांना शुभेच्छा पाठवत आहे. तसे, सध्याच्या वातावरणात नृत्याचे स्वरूप बदलले आहे. हिप हॉप डांसचा क्रेज वाढत आहे. विशेष करुन तरुणांमध्ये हिप हॉप डांसबद्दल अधिक उत्सुकता दिसून येते. तथापि, भारतात अजूनही प्राचीन नृत्य वर्चस्व गाजवते.
 
भारतातील नृत्य परेदशात बॉलिवूड डान्सच्या बहाण्याच का नसो पण प्रसिद्ध आहे. क्लासिक डान्ससह महाराष्ट्राची लावणी, पंजाबी भांगडा, गुजराथी गरबा, राजस्थानी नृत्य अशा अनेक प्रकाराचे पारंपारिक नृत्य जगभरात प्रसिद्धी मिळवत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईसमोर मधल्या फळीतील उणिवा दूर करण्याचे आव्हान