'घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी' हे
जर घारीच्या बाबतीत खरं तर माणसाच्या बाबतीत,
नक्कीच, ते कितीतरी मोठ्या प्रमाणात खरं असणार.
हो ना?
माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असो, शेवटी स्वतःच्या घराकडेच येणार. स्वतःचं घर आणि कुटुंब हाच त्याचा विसावा. आपली तर हीच संस्कृती आहे. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आज आहे 15 मे - आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस (International day of families).
दरवर्षी हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस म्हणून जगभरातल अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. द युनायटेड नेशन्स आणि युनिव्हर्सल पीस फेडरेशन ही यामागची प्रेरणास्थानं आहेत. ‘आर्थिक आणि सामाजिक बदलांमुळे जगातल असंख्य कुटुंबांच स्थैर्यावर परिणाम होत आहे, तसेच कुटुंबाच्या रचनेतही बदल होत आहेत,' हे लक्षात आल्यानं 1993 मध्ये य युनायटेड नेशन्स मध्ये एक ठराव पास केला गेला आणि 1994 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. ‘समाजाचा एक प्रमुख घटक म्हणूनच कुटुंबाचा विचार झाला पाहिजे' या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो. कुटुंबाशी संबंधित अनेक घटकांबद्दल जनजागृती करणं, कुटुंबाला अत्यंत जाचक ठरणार्यात घटकांवर, समस्यांवर प्रकाश टाकून त्या समस्या सोडवणं आणि त्या जाचक घटकांचं प्राण कमी किंवा नाहीसं करणं या विषयांवर या दिवशी भर दिला जातो. त्यामध्ये असं गृहीत धरलं जातं की कुटुंबं समर्थ झाली की राष्ट्र समर्थ होतं.
खरंतर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, समाजरचनेमध्ये कुटुंबाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे एक दिवस ‘कुटुंब दिवस' म्हणून साजरा करण्याची आपलकडे पद्धत नाही. भारतात एकत्र कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असताना रोजच अनेक गोष्टी एकत्रितपणे होत असत. पण आता परिस्थिती बदलली आहे, माणसं खूपच व्यस्त झाली आहेत, शिवाय विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेकदा एकमेकांबरोबरची नाती सुदृढ करायला वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत कुटुंबातली आपुलकी, जिव्हाळा टिकवायचा असेल तर काहीतरी करायला हवं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संवादातून एकमेकांना जाणून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मुलं आणि आपण यांच्या विचारातील तफावत कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा. दोन किंवा त्यापेक्षा जास्त माणसे एकत्र आली की मत-मतांतरे असणारच पण त्यातून रुसवे-फुगवे होणार नाहीत, वाद होणार नाहीत किंवा झालेच तर लगेच ते संपुष्टात येतील, असं पाहायला हवं. कुटुंबात एकत्रितपणे काही गोष्टी करण्याने एकमेकांना जोडणारा एक घट्ट, पक्का, भक्कम आणि खंबीर असा दुवा निर्माण होतो.
एकमेकांवर प्रेम करणं, एकमेकांना आधार देणं, गरजेनुसार सल्ला देणं, त्रासात- दुःखात मदत करणं, सांत्वन करणं, वेळोवेळी प्रगतीसाठी प्रोत्साहन देणं, आराम देणं, आनंद - साधान देणं ही कुटुंब संस्थेची मूल्या आहेत. आपल्याकडे भारतात तर अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत एकमेकांचा विचार करण्याची पद्धत आहे. कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःच्या गोष्टींचा त्याग करण्याची तयारी आहे. आणि आपल्याकडच्या अनेक पिढ्या ही मूल्य पाळतील, असा विश्वास आहे.
यावर्षी म्हणजे 2020 मधील कुटुंब दिनाचा विषय 'फॅमिली अँड क्लायमेट क्शन' असा आहे. या विषयाचा कोरोनानं आपल्याला सध्या वेगळ्या अर्थानं विचार करायला लावला. पण आपण सध्याच्या पसरलेल्या वेगळ्या हवामानाचा, कुटुंबाला आणखी जवळ करून, यशस्वीपणे सामना करूया. त्यासाठी आपल्याच घरातल सगळ्या हसर्या तार्यांना अजून आपलंसं करूया आणि जणू संपूर्ण विश्व हे, 'हे विश्वची माझे घर' या अर्थानं जवळ करूया. या विश्व कुटुंबाला शुभेच्छा देऊया.