Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सहल, नुसतं उच्चारलं तरी, हलके होतो

सहल, नुसतं उच्चारलं तरी, हलके होतो
, शुक्रवार, 18 जून 2021 (15:56 IST)
सहल, नुसतं उच्चारलं तरी, हलके होतो,
निरुत्साह जणू कसा निसटून जातो,
चार मित्र मैत्रिणी हव्या सोबतीनं,
पंख लावून उडतो आपण उत्साहांन,
कुठं जाऊ कुठं नको असं होतं क्षणार्धात,
सगळं आयुष्य च जगून घयावस वाटत त्या क्षणात,
काय किमया असते नाही सहली ची!
मनाचा मोर होऊन नाचू लागतो हो चटदिशी!
लहानसाना पासून सर्वास आकर्षण ह्याचे फार,
वर्षभर सुरू असतात सहली च्याच गोष्टी अपार,
येताक्षणी ती संधी, आपण झपाटतो,
लगेचच उठतो अन तयारीस लागतो,
चला तर मंडळी, चालायचं न सहली ला,
आलेल्या मरगळी ला दूर पळवायला!!
...अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्ली: 'बाबा का ढाबा'च्या कांता प्रसादने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, रुग्णालयात दाखल