पुण्य कमी झाल आणि पाप वाढायला लागलं कि विष्णू अवतार घेतो. पाप वाढल्यामुळेच विष्णू आपला अकरावा अवतार घेणार आहेत अन तो कुणाच्याना कुणाच्या रुपाने विष्णुंचा हा अकरावा अवतार असेल.
फेसबुकवर मोदी भक्त अन भाजपचे प्रवक्ते अवद्धुत वाघ यांनी पोस्ट केली कि मोदी विष्णुंचा अकरावा अवतार आहेत. यात त्यांनी त्याची भावना मांडली असेल. मत मांडण्याचा अधिकार प्रत्यकाचा आहे अन प्रत्येकाची मत वेगवेगळी असू शकतील. त्याविषयी सविस्तर लिहीण मला महत्वाच वाटलं म्हणून त्याविषयीची काही मत मांडत आहे.
काही दिवसांपूर्वीच अटलजींच निधन झाल अन हा महान कवि राजकारणी कित्येक भाजपाईंचा देवच ह्या जगातून निघून गेला. भारतीय जनता पार्टीने त्यांच्या अस्थिंची 4000 कलश करुऩ संपूर्ण भारतात दर्शनासाठी पाठवली होती अन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्या कलशाच्या दऱ्शन घेतलेले फोटो पोस्ट केले होते. त्यावेळेलाही बर्याच माध्यमांमधून त्यांच्यावर टिका झाली होती की एवढी कलश का म्हणून वगैरे वगैरे. असो मुद्दा हा नाहीच आहे मुळात पण सांगावा लागला काहीही झालं की भाजपावर टिका किंवा संघावर टिका करणे विरोधकांची सवयच आहे. महाराष्ट्रातील भाजपचा प्रवक्ता अस म्हणतोय मग संपुर्ण सोशल मिडीयावर तिच चर्चा कि मोदींना भाजपाने देवत्व देवुन टाकलं. पण कुणाचे व्ययक्तीक मत असू शकतात किंवा कुणातही देव शोधू शकतो अन त्याने एका योगी पुरुषात देव शोधला काय वाईट त्यात, का माणसाने माणसात देव शोधू नये.
मोदी तर ईश्वरीच अवतार आहे नाही तर येवढे मोठमोठे चमत्कार होणे शक्यच नाही. भ्रष्टाचारी राक्षसांना संपवण्यासाठी मोदींचा जन्म, पाकला चोक उत्तर मोदीच देवू शकतात त्या साठी मोदींचा जन्म आहे, भारत मातेच्या सेवेतील हा सेवेकरी ईश्वरी अवतार पृथ्वीवर अवतरलाय आता तर राम राज्य राम मंदीर का नाही होणार अन ते नक्की होणार तेथे मोदीच पहीली आरती करणार. कुणीतरी कित्येक वर्षांपुर्वी भविष्यवाणी करुन गेलं होत, हिमालयात तपश्चर्या करणारी व्यक्ती ईश्वरी अवतार भारतात जन्म घेणार अन पंतप्रधान होणार, ही भविष्यवाणी खरी ठरलीय अन अवतारी पुरुष पंतप्रधान झालाय.
घोटाळा, भ्रष्टाचार, पाप, दलाली, काळा पैसा ह्या राक्षसांचा वध करण्यासाठीच मोदींचा जन्म झालाय. हा अवतार दुसरा तिसरा कुठलाच नाही तर कल्की अवतार आहे अन तो भगवंताने मोदींच्या रुपाने घेतलाय. हा अवतारी पुरुष 2019 लाही पंतप्रधान होणार यात काळी मात्र शंका नाही.