Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निसर्गाचे 5 घटक जाणून घ्या

निसर्गाचे 5 घटक जाणून घ्या
, शनिवार, 5 जून 2021 (12:10 IST)
हिंदू धर्मानुसार आपले विश्व, पृथ्वी, प्राणी, जीव,आणि मानव या आठ घटकांपासून निर्माण केले गेले आहेत. या आठ घटकांपैकी पाच घटक आपल्या सर्वांना परिचित आहेत. बाकीचे 3 घटक म्हणजे मन, बुद्धिमत्ता आणि अहंकार. या पैकी  5 घटकांचे महत्त्व जाणून घेऊया.
 
1 पृथ्वी घटक-आपले भौतिक शरीर पृथ्वीच्या घटकापासून बनलेले आहे. जोपर्यंत इतर घटक त्याचा भाग बनल्या शिवाय या शरीरात प्राण येऊ शकत नाहीत. आपले शरीर पृथ्वीपासून बनविलेले घटक, धातू आणि अधातू पासून देखील बनलेले आहे. दगड, पर्वत, झाडे, सर्व घन घटक पृथ्वीचे घटक आहेत.
 
2 पाण्याचे घटक-पृथ्वी किंवा जगाचे तत्व पाण्यापासून निर्माण झाले आहे. सुमारे 70 टक्के पाणी पृथ्वीवरआणिआपल्या शरीरात आहे, ज्याद्वारे हे जीवन चालते. शरीरात आणि पृथ्वीवर वाहणारे सर्व द्रव घटक हे सर्व पाण्याचे घटक आहेत. मग ते पाणी असो, रक्त असो, चरबी असो किंवा शरीरात बनणारे सर्व प्रकारचे रस आणि एन्जझाइम्स असो.
 
3 अग्नी तत्व-पाणी अग्निपासून निर्माण झाले आहे. या पृथ्वी आणि आपल्या शरीरात अग्नि ऊर्जाच्या रूपात अस्तित्वात आहे.आपल्या शरीरातील उष्णता हे अग्नीचे घटकच आहे.हेच अग्नी घटक अन्नाचे पचन करून शरीर निरोगी ठेवतात.हे घटक शरीराला सामर्थ्य देतात.
 
4 वायू घटक-वायूमुळेच अग्नीची उत्पत्ती झाली आहे.पृथ्वी आणि शरीरात ही वायू प्राणवायूच्या रूपात अस्तित्वात आहे.शरीरातून वायू निघाल्यावर शरीर निष्प्राण होत.आपण श्वासाच्या रूपात जी हवा किंवा वायू घेतो त्यामुळेच आपण जिवंत आहोत.पृथ्वी देखील श्वास घेत आहे.
 
5 आकाश घटक- आकाश घटक असं घटक आहे ज्यामध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी आणि हवा अस्तित्त्वात आहे. जर आकाश नसेल तर आपली पृथ्वी आणि आपण कुठे राहणार?आपण जिथे राहत आहोत ते आकाशच आहे.आकाश घटक हे आपल्या शरीरात देखील असतात.
 
पृथ्वीचे पर्यावरण वाचवा- या पाच घटकांना एकत्रितपणे पंचतत्व म्हणतात.जर पृथ्वी आणि शरीरावर यापैकी एक ही घटक नसेल तर इतर चारही जगत नाहीत. या 5 घटकांपैकी एक घटक कमी होणे म्हणजे मृत्यू होणे आहे. म्हणूनच पृथ्वीचे पर्यावरण वाचविणे महत्वाचे आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रतीक्षा संपली! WhatsAppमधील नवीन फीचर चॅटिंगची मजा दुप्पट करेल