अटल जींची एक कविता आठवली कदम मिलाकर चलना होगा| सद्यपरीस्थिती खूपच गंभीर आहे. कोरोना नावाचा राक्षस संपुर्ण जगात आहाहाकार माजवतोय. जग ही लढाई लढतय. अन या सार्या परीस्थितीत भारत एक आदर्श देश अन मार्गदर्शक म्हणून पुढे आलाय. ही लढाई भारतच जिंकेल यात काडी मात्र शंका नाही. 130 करोड जनता मोदींच्या आदर्शवर अन संपुर्ण जग मोदींच कौतुक करतय. पण काही विघ्न संतोषी लोकांना हे बघवत नाही अन या लढाईत भारत कसा पराभूत होईल अन भारताला कसं जास्तीत जास्त नुकसान होईल हेच बघितलं जातय. काही दिवसांपुर्वी राज साहेब म्हटलं असल्या विघ्न संतोषी लोकांना गोळ्या घाला. अन हिच शिक्षा यांना योग्य आहे.
असो आज अमेरिका सारखा देश कोरोना मुळे हतबल झालाय भारताला मदत मागतोय. इटली, फ्रांस, जर्मनी, जापान, ब्रिटन, स्पेन यांसारखे बलाढ्य देश कोरोना समोर टिकू शकले नाहीत.
भविष्यात ही लढाई अजून ताकदिनं लढावी लागेल. अन यात भारत मार्गदर्शक असेल. या लढाईत श्री कृष्णा सारखा या जगाचा सारथी भारत होईल यातही शंका नाही. ही लढाई भारताने जिंकलीच आहे. अन आता ही लढाई जगाला जिंकायची आहे. संतांच्या वाणी प्रमाणे हे विश्वची माझे घर..तेव्हा ह्याच नियमाने भारतही संपुर्ण जगाच कल्याण करु शकतो. भारताची आदर्श तत्वे जग आचरणात आणतोय.
जय हिंद जय भारत
वीरेंद्र सोनवणे