Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फसवणारी वधू-वर सूचक मंडळे

फसवणारी वधू-वर सूचक मंडळे
, सोमवार, 11 जानेवारी 2021 (16:24 IST)
वधू-वर सूचक केंद्र किंवा मंडळे आता बिनभांडवली धंदा झाला आहे. वधू-वर सूचक मंडळे प्रत्येक शहरात, गावात वाढलेली आहेत. अशी मंडळे उघडायला फार मेहनत करावी लागत नाही. अनेक वधू-वर सूचक मंडळे वृत्तपत्रात जाहिराती देतात. त्यांचे फोन नंबर खूप असतात. पण त्यातील काही नंबरच अस्तित्वात असतात. अशी अनेक वधू-वर सूचक केंद्रे लाखो  लोकांना सहज फसवितात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली येथील वधू-वर सूचक मंडळे महाराष्ट्रातील नामवंत वृत्तपत्रात जाहिराती मोबाइल नंबरसह देतात. मात्र पत्ता ते कुठेच देत नाहीत. क्वचितच आपले पत्ते देतात.
 
अनेक वधू-वर सूचक मंडळे आज फसवणूक, धोका, आर्थिक पिळवणूक करणार्यांशची मोठी केंद्रे बनली आहेत. या मंडळावर सरकारचा, पोलीस खात्याचाही अंकुश नाही. व्यापारी आयकर  भरण्याचा तर प्रश्नच नाही. बर्या,च वधू-वर मंडळांचे चालक हे आपले गुन्हे लपविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, पुढारी झालेले दिसतात. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील मॅरेज ब्यूरोंनीकाही गुंडही पाळलेले वृत्तपत्रातील बातम्यांवरून दिसून येते. ही वधू-वर सूचक मंडळे मोठी फी आकारून पालकांचे खिसे रिकामे करतात. भोळेभाबडे पालक आपल्या मुला- मुलींना चांगले स्थळ मिळेल, या आशेवर जगत असतात. पण या चालकांना पैसाच सगळ्या ठिकाणी दिसतो. पुण्यात 140 च्यावर, मुंबईत 200, कोल्हापूर 100, सोलापूर 50 च्या वर वधू-वर सूचक मंडळे आहेत. घर हेच त्यांचे ऑफिस झालेले आहे. काही तरुण नोकरी व्यवसाय नसल्याने यात शिरून ते आता श्रीमंत होत आहेत. काही सेवानिवृत्त, ज्येष्ठ नागरिकही या क्षेत्रात पैसा कमवत आहेत. दुर्दैवाने जी फी आकारली जाते त्यासाठी त्यातील अनेक मंडळे पावती देतच नाहीत. शिवाय मुला- मुलींचे लग्न ठरल्यानंतर देणगी घेतात. हा ब्लॅक मनी असतो. त्याचीही हे बिलंदर पावती देत नाहीत. उलट तगादा लावून गैरमार्ग वापरून पैसे वसूल करतात.
 
आज महाराष्ट्रात 10 लाखांच्या वर छोटी-मोठी वधू-वर सूचक मंडळे विविध जाती-उपजातींची आहेत. काही जोडधंदा म्हणून या धंद्याकडे पाहतात आणि पैसे कमवितात. काही वधू-वर सूचक मंडळे एकाच मुलीचा किंवा मुलाचा फोटो अनेकांना दाखवून त्या पालकांकडून पैसे लुटतात. काही वधू-वर सूचक मंडळे काही मुला-मुलींना राखीव ठेवतात. त्यांना काही पैसे देतात. नंतर ही देखणी मुलगी त्या वधूवर सूचक मंडळाकडून पैसे घेते. मग वधू-वर सूचक मंडळे काहीतरी कारण दाखवून पालकांना फसवतात. मीटिंगचे पैसे मात्र खूप घेतात. पोलिसांनाही याचा पत्ता नसतो. अनेक पालक पोलिसांकडे तक्रार करीत नाहीत. वधू-वर सूचक मंडळे मुला-मुलींची खोटी माहिती पालकांना देतात. काही चांगल्या संस्था या क्षेत्रात टिकून आहेत. अनेक वधू-वर सूचक मंडळांचे चालक या केंद्रासाठी जागा काही भाड्याने घेऊन आपण पत्रकार, पदाधिकारी आहोत, सामाजिक कार्य केवळ तुमच्यासाठी करतो, असे गोड बोलून लोकांना फसवितात. वधू-वर सूचक मंडळांचे मेळावे हादेखील फार्स आहे. पुन्हा हे चालक पालकांकडून पैसे उकळतात. एकूण पालकांचा खिसा रिकामा कसा होईल, यासाठी हे चालक, व्यवस्थापक अनेक खेळी करतात. काही व्यक्तिगत स्वरूपात असे कार्य करतात. मुलगा-मुलगी दाखवण्यासाठी पालकांकडून जाणे-येणे, रेल्वे-एसटीचे भाडे, शिवाय लॉज खर्च, अन्य खर्च उकळतात. अशी वधू-वर सूचक मंडळे बीड, कर्नाटकात खूप आहेत.कर्नाटकमधील काही वधू-वर सूचक मंडळे मुलीला एक आठवडा फसवणारी वधू-वर सूचक मंडळे मुलाकडे नांदविण्यासाठी पाठवतात. मग हीच मुलगी काहीतरी खोटी कारणे दाखवून कोणालाही न सांगता पैसे, दागिने घेऊन पळून जाते. अशावेळी हीच वधू-वर सूचक मंडळे हात वर करून आपण अलिप्त असल्याचे दाखवितात. म्हणून या वधू-वर सूचक मंडळांपासून पालकांनी सावध राहाणे आवश्क आहे. आता फेसबुक, व्हॉट्‌सअॅपवर या बाबतीत अनेकांची फसवणूक होत आहे. यासाठी जागरूकता महत्त्वाची आहे. आता नोकरी नसल्याने तरुण-तरुणीही या क्षेत्रात येऊन स्वतःचे उखळ पांढरे करून घेत आहेत. शासनाने अशी वधू-वर मंडळे रद्द करण्याचे आदेश काढले पाहिजेत. शासकीय नोंदणी ज्यांनी केली आहे त्यांनाच हा व्यवसाय करण्यारसाठी  परवानगी दिली पाहिजे.
 
सर्व वधू-वर सूचक केंद्रांवर अंकुश ठेवयला पाहिजे. फी किती घ्यायची, याची मार्गदर्शक तत्त्वे नियमावली झाली पाहिजे. सर्व व्यवहाराची रोख, चेकने पावती पालकांना दिली पाहिजे. शासनाने नोंदणीकृत वधू-वर सूचक मंडळांची नावे वृत्तपत्रांतून जाहीर केली पाहिजेत. आता अनेक वधू-वर सूचक मंडळे ऑनलाइनवरून आपल्या बँक खात्यात पैसेपाठविण्यास सांगत आहेत. याठिकाणी तर हमखास फसवणूक केली जाते. 
 
फसवणूक केल्यावर हे लोक फोन बंद करतात. पुन्हा नवीन मोबाइल नंबर घेतात. पुन्हा अनेकांची फसवणूक करतात. म्हणून ग्राहकांनी त्यांच्या खात्यात पैसे पाठवू नयेत. 
जगदीशचंद्र कुलकर्णी
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माझ्या जीवाला धोका आहे, कमी जास्त झाल्यास सरकार जबाबदार - राणे