Publish Date: Wed, 11 Jan 2017 (16:42 IST)
Updated Date: Wed, 11 Jan 2017 (16:46 IST)
मॅकडोनल्ड्स लवकरच मसाला डोसा ते अंडा भुर्जी असे वैविध्य असलेले बर्गर्स आणण्याच्या तयारीत आहे.सकाळच्या वेळेत ग्राहकांना खेचून आणण्यासाठी हा बदल करण्याचा कंपनीचा मानस आहे. मोलगा पोडी सॉस असलेले मसाला डोसा बर्गर, अंडा बुर्जी हे पदार्थ मॅकडोनल्ड्सच्या मेन्यूकार्डमध्ये पाहायला मिळतील. येत्या वीकेंडला नवा मेन्यू मॅकडीमध्ये दिसण्याची चिन्हं आहेत. सुरुवात मुंबईपासून होईल, त्यानंतर हळूहळू देशभरातील मॅकडीच्या आऊटलेट्समध्ये हा ‘नाश्ता’ मिळेल. सोबक स्पिनच आणि कॉर्न ब्रोशे, प्लेन किंवा मसाला स्क्रॅम्बल्ड एग्ज, वॅफल्स, हॉटकेक्स हे पदार्थही ब्रेकफास्टला मिळतील. आरोग्यदायी न्याहारीसाठी तळलेल्या पदार्थांऐवजी ग्रिल्ड मेन्यू असेल.