Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदी बनले सोशल मीडियाचे बॉस

मोदी बनले सोशल मीडियाचे बॉस
अमेरिकाचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊस सोडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे राजकीय नेता बनले आहेत. पीएमओच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब आणि गूगल प्लस या सोशल मीडियावर असलेल्या राजकीय नेत्यांमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहेत.
 
मोदी यांच्या टि0टर, फेसबुक, गुगल प्लस, लिंयडइन, इनस्टाग्राम, यूट्यूबवर क्रमश: 2.65 कोटी, 3.92 कोटी, 32 लाख, 19 लाख, 58 लाख, 59 लाख फॉलोअर्स आहेत. राजकीय नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी यांची अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय आहे. हे अ‍ॅप सुमारे एक करोड जणांनी डाऊनलोड केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाळासाहेबांच्या जन्मदिवशी शिवसेनेचा वचननामा