Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जन्मापासुन मृत्युपर्यंत अडीच अक्षरांत बांधलेले आयुष्य

motivational thought
, बुधवार, 27 जानेवारी 2021 (10:40 IST)
अडीच अक्षरांचा कृष्ण
अडीच अक्षरांची लक्ष्मी
अडीच अक्षरांची श्रद्धा
अडीच अक्षरांची शक्ती!
 
अडीच अक्षरांची कान्ता
अडीच अक्षरांची दुर्गा
अडीच अक्षरांची ईच्छा 
नी अडीच अक्षरांचा योध्दा!

अडीच अक्षरांचे ध्यान
अडीच अक्षरांचा त्याग
अडीच अक्षरांचेच कर्म
नी अडीच अक्षरांचाच धर्म!
 
अडीच अक्षरांत भाग्य
अडीच अक्षरांत व्यथा
अडीच अक्षरांतच व्यर्थ
बाकी सारे मिथ्या!
 
अडीच अक्षरांत सन्त
अडीच अक्षरांचा ग्रंथ
अडीच अक्षरांचा मंत्र
नी अडीच अक्षरांचे यंत्र!
 
अडीच अक्षरांची तुष्टी
अडीच अक्षरांचीच वृत्ती
अडीच अक्षरांतच श्र्वास
नी अडीच अक्षरांतच प्राण!
 
अडीच अक्षरांचा मृत्यू
अडीच अक्षरांचाच जन्म
अडीच अक्षरांच्याच अस्थि
नी अडीच अक्षरांचाच अग्नि!
 
अडीच अक्षरांचा ध्वनी
अडीच अक्षरांचीच श्रुती
अडीच अक्षरांचा शब्द
अडीच अक्षरांचाच अर्थ!
 
अडीच अक्षरांचा शत्रू
अडीच अक्षरांचा मित्र
अडीच अक्षरांचेच सत्य
अडीच अक्षरांचेच वित्त!
 
जन्मापासुन मृत्युपर्यंत
अडीच अक्षरांत बांधलेले
आयुष्य हे मानवाचे
नाही कुणा उमगले!!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रवादीच्या 'राष्ट्रवादी परिवार संवाद' दौर्‍याला गुरुवारपासून सुरुवात