चिक्कूची बी फळात राहूनही फळ पक्व झाले की, त्यातून अलगद बाहेर पडते अगदी स्वच्छपणे. आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते, फळ पिकलं तरी रसातून अलग होत नाही. परिणामी तिलाही लोक पूर्ण चोखल्याशिवाय फेकत नाही.म्हणून चिक्कूच्या बी सारख वागावं सगळ्या मोहजाळात राहूनही, योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं. कोयीसारखं माया रुपी रसात गुरफटून रहाल तर, लोक मात्र पिळून फेकल्याशिवाय राहणार नाहीत.
संयम हा यश मिळविण्यासाठी लागणारा सर्वात मोठा घटक आहे.
स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे.
जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…
जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो, ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे.
यश ही तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा ते आपोआप तुमच्यामागे येईल. लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता.
जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते.
आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे.
सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा. मन प्रसन्न करा सगळी दुःख आपोआप दूर होतील.
जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण,उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…