Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईचा धोबीघाटाची वार्षिक उलाढाल तब्बल 100 कोटी

मुंबईचा धोबीघाटाची वार्षिक उलाढाल तब्बल 100 कोटी
मोकळ्या आकाशाखालची सर्वात मोठी लाँड्री अशी ओळख असलेल्या मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातील १२५ वर्षे जुन्या धोबीघाटाची वार्षिक उलाढाल तब्बल १०० कोटींपेक्षा अधिक असल्याचे धोबी कल्याण व आद्योगिक विकास को.ऑप. सोसायटीचे म्हणणे आहे.

ब्रिटीश काळात १८९० साली निर्माण केल्या गेलेल्या या धोबीघाटावर दररोज ७००० धोबी कपडे धुणे, वाळवणे, डाय करणे व प्रेस करणे अशी कामे दिवसातले १८ ते २० तास करत असतात. आज दिलेले कपडे दुसरे दिवशी शहराच्या विविध भागातील ग्राहकांपर्यंत स्वच्छ करून पोहोचविणे हे काम गेली १२५ वर्षे अव्याहत सुरू आहे व तेही वेळ न चुकविता.
 
 
धोबी असोसिएशनचे मनुलाल कनोजिया सांगतात या घाटावरील श्रीमंत धोब्यांनी आता हाताने कपडे धुणे वाळविण्याऐवजी मोठ मोठी मशीन्सच येथे लावली आहेत.
 
मात्र आजही हाताने कपडे धुणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. येथे सरासरी दररोज १ लाख कपडे धुतले जातात. आजकाल घराघरातून व मोठमोठ्या हॉटेल्समधून वॉशिंग मशीन्स आली असली तरी धोब्यांच्या व्यवसायावर त्याचा कांहीही परिणाम झालेला नाही. लाँड्रीत १ पँट अथवा साडी धुवायला ५० रूपये द्यावे लागतात ते काम आम्ही चार ते पाच रूपयांत करतो. प्रत्येक धोबी दिवसाला किमान ४०० साड्या धुवत असतो. शिवाय ग्राहकाला दुसर्‍या दिवशी कपड्यांची डिलिव्हरी मिळणार याची खात्री असते. आमच्या या घाटाचे नांव गिनीज बुकमध्येही नोंदविले गेले आहे.
 
मुंबईचा धोबीघाट हा परदेशी पर्यटकांचेही विशेष आकर्षण आहे. दिवसभरात येथे अनेक परदेशी पर्यटक येतात, दिवसभर फिरतात. येथील घाणीबद्दलही धोबीघाट प्रसिद्ध असून मलेरिया व डेंग्यूचे सर्वाधिक रूग्ण याच भागात सापडतात असेही समजते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय इंजिनियरची हत्या अस्वस्थ करणारी: व्हाइट हाऊस