Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2020: का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या उद्देश्य आणि इतिहास

राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2020: का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या उद्देश्य आणि इतिहास
, बुधवार, 4 मार्च 2020 (12:05 IST)
भारतात दरवर्षी 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो. हा दिवस आता नेशनल सेफ्टी वीक म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आठवडा म्हणून साजरा केला जातो.
 
उद्देश्य
4 ते 10 मार्च या दरम्यान साजरा होणार्‍या या आठवड्यात लोकांना जागरुक केलं जातं. सामान्य लोकांमध्ये सुरक्षेप्रती जागरुकता यावी तसेच अपघात होऊ नये हा उद्देश्य आहे. या आठवड्यात विभिन्न जागरुकता कार्यक्रमांच्या माध्यमातून औद्योगिक अपघातांपासून बचाव करण्याचे उपाय सांगण्यात येतात. या पूर्ण आठवड्यात केल्या जाणार्‍या क्रियाकलापांचा उद्देश्य लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी जागरुक करणे आहे. कारखान्यात काम करताना सुरक्षिततेची साधने वापरावी तसेच इमरजेंसी कशी हातळावी, राष्ट्रीय संपत्तीचे जतन आणि संवर्धन याचे देखील महत्तव असल्याची जाणीव करुन दिली जाते.
 
इतिहास
हा दिवस साजरा करावा यासाठी नेशनल सेफ्टी काउंसिलने पुढाकार घेतला होता. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात 4 मार्च 1972 पासून झाली आहे. या दिवशी भारतात नेशनल सेफ्टी काउंसिलची स्थापना झाली होती, म्हणून हा दिवस नेशनल सेफ्टी डे या रुपात साजरा केला जातो.
 
नेशनल सेफ्टी काउंसिल एक स्वायत्त संस्था आहे जी सार्वजनिक सेवेसाठी गैर शासकीय आणि गैर लाभकारी संघटनच्या रुपात कार्य करते. या संघटनाची स्थापना 1966 मध्ये मुंबई सोसायटी अधिनियम अंतर्गत झाली होती ज्यात आठ हजार सदस्य सामील होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ: भाजप