नँशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र (संलग्न नँशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस इंडिया, नवी दिल्ली) च्या वतीने. महिला पत्रकारांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलनचे आयोजन पनवेलच्या आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दि. २४ व २५जून २०१७ रोजी करण्यात आले आहे.
या संमेलनात देशभरातील आपल्या अधिकारांसाठी लढणाऱ्या ५००हून अधिक महिला पत्रकार सहभागी होणार आहेत.
भारतात मध्यमवर्गातील महिला पत्रकार म्हणून नोकरी करतात. त्यांची संख्या मोठी आहे मात्र गुणवतेच्या दृष्टीने त्यांच्या हक्काचे स्थान त्यांना मिळत नाही. आणि बहुसंख्य महिला पत्रकारांना अनेकदा कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने महिलांसाठी सुरक्षा व्यवस्थेसाठी देशातील सर्वच राज्यांना आदेश दिले आहेत. पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी लढणारी राष्ट्रीय संघटना नँशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स (इंडिया) अनेक वर्षांपासून अशा प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी लढते आहे. माध्यमकर्मींसाठी सर्व सुरक्षा कायद्या/आयोगाची मागणी सातत्याने करीत आहोत. आणि काही प्रमाणात एनयूजेची ही मागणी पूर्ण झाली आहे .
महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक माध्यमात विशाखा कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून एनयुजे महाराष्ट्रची लढाई सुरूच आहे. आणि म्हणूनच देशभरातील जागरूक महिला पत्रकारांना एकत्र आणून यावर मंथन होण्याची व त्यातून पुढील दिशा ठरविण्याची निकड होती. त्यासाठीच एनयुजे महाराष्ट्रच्या वतीने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील महत्त्वपूर्ण पाईक असणाऱ्या देशभरातील महिला माध्यमकर्मीचे संमेलन दि २४व २५ जून २०१७ रोजी पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती अध्यक्ष डॉ उदय जोशी यांनी दिली.
आद्यक्रांतीकारी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणाऱ्या या शक्ती जागरात तीन परिसंवाद व दिग्ग्ज पत्रकारांसोबत राजकीय, उदयॊग, पोलीस, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज महिलांचा मेळावा घेण्यात येणार आहे. या संमेलनाच देशातील पाच ज्येष्ठ महिला माध्यमकर्मींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच महाराष्ट्रातील १0 महिला माध्यमकर्मीना त्यांच्या लक्षणीय योगदानासाठी गौरविण्यात येणार आहे. संमेलनाच्या उद्घाटनास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. हंसराज अहिर यांना निमंत्रित करण़्यात आले आहे. २५जूनला होणाऱ्या समारोपासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री ना.प्रकाश जावडेकर व गृहृ राज्य मंत्री डॉ रणजीत पाटील यांना निमंत्रित केले आहे. या निमित्ताने एका स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.
देशभरातील पाचशेहून अधिक महिला माध्यमकर्मी या संमेलनात सहभागी होणार आहेत.महाराष्ट्रातील महिला माध्यमकर्मींनी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन संमेलनाच्या निमंत्रक. एनयूजे महाराष्ट्र सरचिटणीस शीतल करदेकर यांनी केले आहे.