Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

शास्त्रज्ञांनी शोधला शनिसारखा नवा ग्रह

new grah like shani
, बुधवार, 27 जून 2018 (14:06 IST)
अहदाबादमधील भौतिक संशोधन प्रयोगशाळा (पीआरएल) या संस्थेतील शास्त्रज्ञांनी एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. सूर्यासारख्या एका तार्‍याजवळ हा ग्रह असून या ग्रहाला ईपीआईसी 211945201 बी किंवा के 2-236 बी असे नाव देण्यात आले आहे. प्रा.अभिजीत चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या एका चमूने हा शोध लावला आहे. हा ग्रह उप-शनि किंवा सुपर नेपच्युन आकारातील आहे.
 
पृथ्वीच्या आकारमानापेक्षा तो 27 पट मोठा असून त्याची त्रिज्या पृथ्वीपेक्षा 6 पट आहे. अमेरिकन अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी या संस्थेच्या ऑनलाइन नियतकालिकात हा संशोधन प्रबंध प्रसिद्ध झाला आहे. या शोधामुळे आपल्या सौर प्रणालीबाहेरच्या ग्रहांचा शोध लावणार्‍या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मिक पीआरएल अ‍ॅडवान्स रेडियल-व्हेलोसिटीअबू-स्काय सर्च (पारस) या स्पेक्ट्रोग्राफने या ग्रहाचा शोध लावण्यात आला, हे विशेष.
 
पारस (पीएआरएएस) हा संपूर्ण आशियात त्याच्या पद्धतीचा एकमेव स्पेक्ट्रोग्राफ आहे. हा स्पेक्ट्रोग्राफ   माऊंट आबू येथील गुरूशिखर वेधशाळेत 1.2एम टेलिस्कोपने सुसज्ज आहे. पृथ्वीच्या आकारमानापेक्षा 10 ते 70 पट मोठ्या असलेल्या केवळ 23 प्रणालींचा आतापर्यंत शोध लावण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कमला हारिस यांना व्हायचे अमेरिकेच्या अध्यक्षा