एखाद्यावेळी आम्ही व्यायाम करताना पायाच्या अंगठ्याला हाताने पकडून आपले शरीर किती लवचीक आहे, याचा विचार करून खूश होतो. मात्र, जर तुम्ही 22 वर्षीय ओडका या तरुणीची लवचीकता पाहाल तर तुम्हाला निश्चितपणे लवचीकता म्हणजे नेमके काय, याचा अर्थ समजेल.
उल्लेखनीय म्हणजे ओडका एखाद्या लहान बाटलीमध्येही आरामात बसू शकते. तसे पाहिल्यास ओडका एक सर्कशीतील कलाकारच आहे. तरीही तिने आपले शरीर जास्तीत जास्त लवचीक बनवण्यासाठी सुमारे 10 वर्ष कठोर परिश्रम केले. या परिश्रमाचे फळ म्हणून तिचे शरीर लहानशा बाटलीत बसण्याइतपत लवचीक बनले.
मंगोलियाची राजधानी उलानबातार येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या ओडकाने सर्कशीत काम करणार्या आपल्या काकीला पाहून आपले शरीरही लवचीक बनवण्याचा निर्णय घेतला. केवळ 11 वर्षांची असताना तिने शरीर लवचीक बनवण्यासंबंधीच्या सरावास सुरुवात केली. यास तिने अखेरीस यशही मिळविले.
यामुळे लहान वयातच बाटलीत बसण्यासाठी आवश्यक असलेली कला अवगत करण्यासाठी मांसपेशी आकुंचित करणे आणि त्या अधिक सक्षम बनवण्यास शिकली.
यामुळे 15 व्या वर्षीच ती सर्कशीत सहभागी झाली. ओडका सध्या ब्रिटनच्या दौर्यावर आहे. तिचे कौशल्या पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे.