Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अवयवदान Organ Donation

अवयवदान Organ Donation
Organ Donation जिवंत किंवा मृत व्यक्तीच्या शरीरातील ऊती किंवा कोणताही अवयव दान करणे याला अवयवदान म्हणतात. हा ऊतक किंवा अवयव दुसऱ्या जिवंत व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित केला जातो. यासाठी दान केलेला अवयव शस्त्रक्रियेने दात्याच्या शरीरातून काढून टाकला जातो.
 
अवयवदान म्हणजे केवळ गरजू लोकांना अवयव दान करणे नसते पण एखाद्याला जीवनदान देणे किंवा पुनर्जन्म देण्यासारखे आहे. असं मानलं जातं की एका मुलाला जन्म देताना आईचा पुनर्जन्म होतो, म्हणजे एका जीवाला देखील ती जन्म देते आणि स्वतःला पण. पण या प्रकरणात फक्त आईलाच ही संधी मिळते. त्याच प्रकारे ही संधी जर सगळ्यांना अवयव दान या रूपात मिळू शकते तर का नाही त्याचे लाभ घ्यावा आणि आपण देखील कोणाला जीवनदान देण्याचा सुखद भावनेचा अनुभव घ्यावा?
 
वर्ष 2019 मध्ये जगातील स्पेनमध्ये अवयव दातांचा दर सर्वाधिक जास्त होता, म्हणजे प्रति दशलक्ष लोकसंख्येमध्ये 46.91. भारतामध्ये कॉर्निया दान हा खूप विकसित आहे. भारतात सहा प्रकारचे जीवनरक्षक अवयव आहेत जे प्राण वाचवण्यासाठी दान केले जाऊ शकतात यामध्ये मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुसे, स्वादुपिंड आणि आतडे हे आहेत. गर्भाशय प्रत्यारोपण देखील भारतात सुरू झाले आहे. वर्षात अंदाजे 5 लाख अवयवांची गरज असते. ह्याचातून भारतात 2 -3 टक्के मागणी पूर्ण होते.
 
जगात अनेक लोकं ह्यामुळे प्राण गमावतात कारण त्यांना नेमका उपचार मिळत नाही कारण उपचारासाठी विशिष्ट अवयव उपलब्ध होत नाही. ह्याचा अनुभव आपल्यापैकी कित्येकांना कोविडच्या काळात आला असेल.
 
अवयव दानाची कमी ह्यामुळे पण आहे कारण लोकांना ह्याच्याबद्दल पुरेसा माहिती नाही आहे. काही सामान्य अवयव प्रत्यारोपण मधून किडनी, हृद्य, आतड्या, लिव्हर, स्वादुपिंड, फुफ्फुसे, हाडे, अस्थिमज्जा, त्वचा आणि कॉर्निया हे आहे.
 
बहुतेक अवयव दान व्यक्तीचे मृत्यूनंतर केले जातात. हा कशा प्रकारे करता येतं ह्याची संपूर्ण माहिती असणे महत्त्वाचे आहे. अवयव दानाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. डॉक्टर शस्त्रक्रियेद्वारे अवयव काढतात आणि ते अवयव प्रत्यारोपित होयपर्यंत ते विशेष रासायनिक द्रावणात जपून ठेवले जातात. मृत्यूनंतर अवयव दान करण्यासाठी ह्यातर व्यक्तीद्वारे आधीपासूनच अवयव दानाची प्रक्रिया केली असावी नाहीतर त्यांच्या कुटुंबाच्या संमतीने हे कार्य केलं जातं.
 
जिवंतपणी अवयव दान
काही अवयव दान जिवंतपणात देखील होऊ शकतात. यापैकी सगळ्यात सामान्य अवयव दान आहे किडनी आणि यकृत (लिव्हर), कारण व्यक्ती दोन किडनींपैकी एक किडनी दान करून पण एकावर जिवंत राहू शकतो आणि यकृत(लिव्हर) दान मध्ये यकृताचा काही भाग दान करू शकतात. कारण यकृत पुन्ह निर्मित होतं, आणि जवळजवळ  त्याच्या मूळ आकारात वाढून त्याचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य करतं. ह्याशिवाय जिवंत लोक प्रत्यारोपणासाठी ऊतक दान करू शकतात - जसे की त्वचा, अस्थिमज्जा आणि रक्त तयार करणाऱ्या पेशी.
 
कोण करू शकतो अवयव दान?
ज्यांच्यात अवयव दान करण्याची क्षमता आहे ते दान करू शकतात. सर्व वयोगटातील लोक अवयव दान करू शकतात. 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे तरुण अवयव दान करण्यासाठी पालक किंवा कायदेशीर पालकांची परवानगी असणे आवश्यक आहे आणि बहुतेक राज्यांमध्ये वयाच्या 18 वर्षापूर्वी मृत्यू झाल्यानंतर पालकांना देणगीचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे.
 
जर सगळ्यांनाच एकेदिवस मृत्यूला सामोरा जायचं आहे तर का नाही कोणाला जीवनदान देऊन जावं? आपल्या या एका निर्णयाने एक किंवा त्यापेक्षा अधिक लोकांचे आयुष्य वाचवतं आले तर ह्याच्यापेक्षा मोठी माणूसकी काय असेल? तर एक प्रण अवयव दानाचा नक्कीच घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shimla Landslide Updates: शिमल्यामध्ये भूस्खलनाची मोठी दुर्घटना