पाकव्याक्त रिकामी करा असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. अविनाश धर्माधिकारी ह्यांनी मार्च महिन्यात "भारताचा पाकिस्तानने व्यापलेला भूभाग कमांडो ऑपरेशन राबवून घेण्याची हिच वेळ आहे" असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन मानवतेचा पान्हा फुटलेल्या स्वयंघोषित सेक्युलर लोकांनी धर्माधिकारी सरांवर तोंडसुख घेतलं होतं. धर्माधिकारींना वेळेचं भान नाही, जग कोरोनाशी दोन हात करण्यात लागलेले असताना पिओके घेण्यासंबंधीचे विचार त्यांच्या मनात येतातच कसे? असे प्रश्न विचारण्यात आले होते. पण या स्वयंघोषित सेक्युलर लोकांचा कोणत्याच गोष्टीतला अभ्यास कच्चा असल्यामुळे आणि मोदी द्वेषाने ह्यांना पझाडलेले असल्यामुळे मूळ विषय समजून घेता येणे यांच्यासाठी अत्यंत कठीण बाब आहे.
आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काश्मिर आपला प्रदेश आहे. आपल्याकडे असलेल्या काश्मिरच्या बबतीतही हे स्वयंघोषित सेक्युलर उदासिन होते. ३७० आणि ३५ ए रद्द करणे अशक्य बाब आहे असं गिरीश कुबेर सुद्धा लिहित होते. पण पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ही अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवलीच ना? शासनाने राजधर्माचे व्यवस्थित पलन केले तर त्यांच्यासाठी गोष्टी शक्य होतात. ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर हाहाकार माजेल अशा प्रकारची भिती दाखवण्यात आली होती. परंतु सरकारने ती परिस्थिती व्यवस्थित हाताळली आहे. सीएएवरुन जी दंगल घडवण्यात आली त्यामागेही बाहेरच्या शक्तीचा हात होता असं समोर येत आहे. या बाहेरच्या शक्तीला भारतात शांतता नकोय आणि बाहेरची शक्ती आतल्या शक्तीच्या संपर्कात आहे ज्यामुळे या दंगली घडवण्यात आल्या होत्या. सरकारी यंत्रणा लवकरच या सर्व बाबींची तपासणी पूर्ण करुन सत्य समोर आणेल अशी अपेक्षा आपण करुया.
आता प्रश्न पाकव्याक्त काश्मिरचा... तर काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. जगात कोरोनाचं संकट असलं तरी काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे सत्य बदलणार नाही. भारतीय नागरिकाने आणि भारत सरकारने राष्ट्रप्रथम हे ध्येय समोर ठेवणे अपेक्षित आहे. या ध्येयाला अनुसरुनच अविनाश धर्माधिकारी ह्यांनी हे वक्तव्य केले होते. केवळ एवढेच कारण नसून धर्माधिकारी सरांचा याविषयीचा अभ्यास दांडगा आहे. त्यांच्या इंस्टिट्युटचं नाव चाणक्य आहे ते उगाच नव्हे. आपण शिवाजी महाराज की जय म्हणतो पण शिवाजी महाराज म्हणजे काय हे आपल्याला अजूनही कळलेले नाहीत. राष्ट्रप्रथम हा मंत्र भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा आपल्याला दिला होता... प्रत्येकाने आपला धर्म पाळला पाहिजे. भारत सरकारचा धर्म भारताचे भले करणे आहे. इतकी वर्षे एकाच कुटुंबाचे व त्यांच्या सेवेत असणार्या लोकांचे भले झालेले आपण पाहिले आहे. त्यामुळे अचानक कुणी भारताच्या भल्याविषयी बोलू लागले तर आपल्याला प्रश्न पडतो. या गोष्टीची आपल्याला सवय नाही. पण ती सवय नरेंद्र मोदींनी आता आपल्याला लावायला सुरुवात केली आहे. आपला योग दिन जग पाळू लागले आहे. पूर्वी आपण जगाचे डे पाळण्यात मग्न होतो. पाश्चात्य राष्ट्रांनी एखादी गोष्ट सांगितली की इथल्या स्वयंघोषित सेक्युलर लोकांना तो अप्रूव्हल वाटायचा. पण परिस्थिती आता बदलली आहे... कुटुंबप्रथम ही संकल्पना मोडून राष्ट्रप्रथम ही छत्रपती शिवरायांची संकल्पना पुन्हा एकदा रुजू झाली आहे. ही संकल्पना एकाएकी रुजू झालेली नाही. त्यासाठी अविनाश धर्माधिकारी सरांसारख्या अनेक लोकांनी हा विषय लावून धरला होता आणि तरुणांच्या मनात राष्ट्रप्रथम ही भावना ते रुजवत होते. त्यास बळ मोदी आल्याने मिळाले आहे.
कोरोनाचे संकट आ वासून उभे आहे. पाकिस्तानसारख्या देश म्हणवून घेण्याची लायकी नसणार्या जमिनीच्या तुकड्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. त्यांना कोरोनाच्या विरोधात लढता देणे केवळ अशक्य आहे. मुळात पाकिस्तान नावाचा देश जगाच्या नकाशावर असणे हेच जगासाठी शाप आहे. कारण भारताने त्यांना सोन्याच्या तबकात पाकिस्तान दिला होता आणि त्या लोकांनी सबंध पाकिस्तान हा जणू खाटिकखाना करुन टाकला आहे. म्हणून एक देश म्हणून जगाच्या नकाशावर राहण्याची त्यांची कुवत नाही. त्यात कोरोनासारखे संकट आले असताना त्यांची अतिशय बिकट परिस्थिती झाली असताना राष्ट्राचा विचार करणे हे कोणत्याही छत्रपती शिवरायांच्या मार्गावरुन चालणार्याचे प्रथम कर्तव्य आहे.
गिलितीत-बाल्टिसानसह संपूर्ण जम्मू-काश्मिर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानने या भागावर अवैधरित्या केलेला कब्जा लगेच सोडून द्यावा असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. गिलिती-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भारताने विरोध केला आहे, पाकिस्तनच्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात निवडणुका घेण्यासाठी ’गव्हर्नमेंट ऑफ गिलिगीत बाल्टिस्तान ऑर्डर’मध्ये संशोधन करायला परवानगी दिली आहे. भारताने याबाबत पाकला पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे आणि पाकच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे जम्मू-काश्मिर, लडाख गिलीगीत आणि बाल्टिस्तान भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. पाकिस्तानी सरकार व त्यांच्या न्यायालयांना भारताच्या अंतर्गत भागात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. पाकिस्तानने अवैधरित्या यावर कब्जा केला आहे. पाकव्याप्त काश्मिरमध्ये बदल करण्याला आमचा तीव्र विरोध असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने पाकला पत्र लिहून खडसावले आहे. त्यामुळे जे धर्माधिकारी ह्यांनी मार्च महिन्यात म्हटले होते तेच आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलेले आहे. पाकव्याक्त काश्मिर रिकामी करायला सांगण्यात आलेला आहे. कारवाई कधी होईल? सरकारचा काय प्लॅन आहे याविषयी सरकारतर्फे गुप्तता पाळण्यात आलेली आहे. पण पाकव्याक्त काश्मिर आमचे आहे असं ठणकावून सांगणारे राज्यकर्ते आपल्याला भेटले आहेत हे आपले भाग्य आहे. हा भाग लवकरच अधिकृतरित्या भारतात येईल अशी केवळ सरकारचीच नव्हे तर देशवासियांचीही अपेक्षा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजे ह्यांच्यातलं वेगळेपण म्हणजे शिवराय हे असे क्रांतिकारक होते ज्यांनी लोकांना जाणीव करुन दिली की हा देश आपला आहे आणि मुघल आदि शत्रू हे परकीय आहेत. ह्यांना देशाबाहेर हाकलून लावणे आपले परमकर्तव्य आहे. शिवरायांच्या मनात स्वराज्य होतं, मावळ्यांच्या मनातही स्वराज्य होतं, इतकंच काय तर रयतेच्या मनातही स्वराज्य आहे... कारण राष्ट्रप्रथम हे ब्रीदवाक्य शिवरायांनी लोकांच्या मनावर बिंबवलं होतं. आता पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झालेली आहे. शासन, सन्य आणि जनता सर्वच राष्ट्रप्रथम या ध्येयाने पछाडलेले आहेत. त्यामुळे अविनाश धर्माधिकारी अगदी योग्य बोलले होते.
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री