आघाडीचे सोशल माध्यम इंस्टाग्रामवरील अर्ध्याहून अधिक सेल्फी हे स्वत:च्या रूपाचा देखावे करणारे असतात. बहुतांश जण सेल्फीद्वारे आपला मेकअप आणि कपड्यांचे प्रदर्शन करतात, असे संशोधकांनी नवीन अभ्यासाद्वारे म्हटले आहे.
अमेरिकेतील जॉर्जिया तंत्रज्ञान संस्थेतील संशोधकांनी याविषयीचे म्हत्तवपूर्ण संशोधन केले जाते. इंस्टाग्रामवर कुठल्या प्रकाराचे छायाचित्र सामान्यत: टाकले जाता याचा आढावा संशोधकांनी आपल्या अभ्यासामध्ये घेतला आहे. त्यानुसार जवळपास 52 टक्के सेल्फी हे देखाव्याच्या श्रेणीत येतात.
या सेल्फीतून लोक आपले मेकअप, कपडे आणि ओठ यासारख्या आदी बाबींचे प्रदर्शन करतात. इतर 14 संयुक्त श्रेणीपेक्षा देखाव्याची बाब दुप्पट लोकप्रिय आहे. मित्रासोबतचे छायाचित्रे, प्रियकर अथवा प्रेयसीसोबतचे फोटो आणि आपल्या पाळीव प्राण्यांसोबतच्या सेल्फीचे प्रमाण 14 टक्के इतके आहे. यानंतर वांशिक छायाचित्राचे प्रमाण 13 टक्के, प्रवासात मौजमजा केलेल्या सेल्फीचे प्रमाण 7 टक्के आणि आरोग्य आणि फिटनेसशी संबंधित 5 टक्के छायाचित्रे इंस्टाग्रामवर आहेत.
उल्लेखनीय म्हणजे ग्रुप छायाचित्रापेक्षा इंस्टशग्रामवर एकल छायाचित्र सर्वाधिक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.