Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोबोटसोबत सेक्स लवकरच शक्य

रोबोटसोबत सेक्स लवकरच शक्य
रोबोट मनुष्यासाठी खूप काम करत असतो. एका एक्सपर्टने लंडन येथे आयोजित एका ग्लोबल कॉन्फ्रेंसमध्ये दावा केला की लवकरच रोबोटसोबत सेक्स करणे शक्य होणार आहे.
 
रोबोटला सेक्स पार्टनरसारखे बनविण्याचा आयडिया आता रिअल लाईफमध्ये उतरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, जसे की आपण सिनेमात आणि टीव्ही शो एक्स मशीना आणि वेस्टवर्ल्डमध्ये बघितले असेल. तज्ज्ञांप्रमाणे यौन सुख देण्यासाठी प्रोग्राम केलेला धातू, रबर आणि प्लास्टिकने तयार केलेला पहिला ऍनिमेटेड लवकरच काही महिन्यातच सर्वांसमोर येईल.
ऑर्टिफिशियल इंटेलिजेंस तज्ज्ञ डेव्हिड लेवी ने म्हटले की रोबोटसोबत सेक्स सुरू होण्यातच आहे, आधी सेक्सबॉट्स येणार, बहुतेक एका वर्षाच्या आतच. कॅलिफोर्निया स्थित कंपनी एबिस क्रिएशंस पुढील वर्षी असे सेक्स रोबोटचा प्रचार सुरू करेल. माणसांसारखे दिसणारे व हालचाल करणारे रोबोट तयार करण्याची योजना आहे. लेवी प्रमाणे 2050 पर्यंत तर रोबोटशी विवाह करणेही शक्य असेल.
 
लंडनच्या या कॉन्फ्रेंसमध्ये रोब‍ोटिक सेक्स टॉयजच्या दुनियेत लेटेस्ट तकनीक दर्शवण्यात आली. जसे असे गॅझेट्स ज्याने दोन लोकं दूर असूनही एकमेकाशी किस करण्याचा अनुभव घेऊ शकतील. या शोधाला किसिंगर म्हटले आहे आणि हे आपल्या मोबाइला जोडून जेव्हा कोणी किस करेल तर सेन्सॉर किसचा प्रेशर पार्टनरच्या मोबाइलने जुळलेल्या डिव्हाईसला लगेच पोहचवेल.
 
लेवीला विश्वास आहे की सेक्स आणि लग्नाप्रती लोकांचे विचार बदलत आहे आणि येणार्‍या काळात अधिकश्या लोकं रोबोट्ससोबत सेक्स आणि प्रेम करणे सहजपणे स्वीकारतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्नाच्या दोन तासानंतर घटस्फोट