Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

...जेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी एक महाराच्या हॉटेलमध्ये चहा पितात

...जेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी एक महाराच्या हॉटेलमध्ये चहा पितात
राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जुने १८७४ मध्ये झाला होता. लहानपाण्यात यांचा नाव 'यशवंत राव' होते. शाहू महाराज एक खरे प्रजातंत्रवादी आणि समाज सुधारक होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात 'बाल विवाह', 'जातीवाद' सारख्या अनेक कुप्रथांचं विरोध करण्याबद्दल कार्य केले होते. त्यांनी 'विधवा पुनर्विवाह' सारख्या विषयांना ही सहयोग दिला.
 
कला, विज्ञान आणि व्यापाराला महत्व देण्यारे शाहू महाराजांनी अनेक चित्रकार, गायक, आदी कलाकारांना आश्रय दिला. त्यांच्या ह्या स्वभावाचे एक उदाहरण आहे ते म्हणजे गंगाराम कांबळे ह्यांचा व्यापाराचा किस्सा :-
 
एके काळी राजर्षी शाहू महाराजांच्या अनुपस्तिथीमध्ये त्यांच्या सैनिकांनीं महार जातीचे गंगाराम कांबळे यांच्यासोबत खूप मारहाण केली कारण ते मराठयांच्या पाण्याच्या होदीवर पाणी घ्यायला गेले होते. महाराजांनी कोल्हापूर परतल्यावर त्या सगळ्या सैनिकांना बोलवून सजा दिली आणि गंगारामच्या पाठी हाथ फिरवून त्यांना स्वतःचा व्यापार सुरु करायची युक्ती दिली.
 
गंगाराम कांबळे यांना शाहू महाराजांनी व्यापार सुरु करण्यास मदद केली. आपला स्वतंत्र व्यापार सुरु करणे म्हणून गंगाराम यांनी 'सत्य सुधारक' नावाने हॉटेल सुरु केली ज्यासाठी शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक सहयोग केला. हॉटेल सुरु करण्यासह त्यांनी हॉटेलमध्ये सफाई आणि इतर आवश्यक प्रबंध ही केले. सगळ्या सुविधा आणि परिश्रमानंतर तिकडे फक्त महार जातीचे लोकच येत असे आणि इतर लोक अशा वेग-वेगळ्या गोष्ट्या करत असे की एक अस्पृश्य जातीच्या माणसाने हॉटेल उघडल्यामुळे त्याच्या हाताचा चहा प्यायला जाणार तरी कोण?
 
पण शाहू महाराजांना तर "अस्पृश्यजाती" म्हणून भेद करणार्‍या लोकांची विचारसरणी मोडायची होती म्हणून एकेदिवशी भ्रमण करताना ते गंगारामांच्या हॉटेल समोर थांबले आणि स्वतःसाठी आणि रथमध्ये बसलेल्या सर्व लोकांसाठी चहा मागविला. अस्पृश्यता संबंधी लोकांचे मत बदलावे म्हणून आणि गंगाराम यांच्या सारख्या अनेक लोकांचे व्यवसाय चालावे यासाठी शाहू महाराजांनी स्वतः गंगारामांच्या हाताचा चहा घेतला. जेव्हा शाहू महाराजांनी चहा घेतला तर इतर सगळ्यांना ही तो पिणे भाग पडले आणि या प्रकारे त्यांनी स्वतः हा भेद मोडून समानता कायम राखली. 
 
या घटनेवरून आपल्याला हे कळतं की शाहू महाराज एक निष्ठावान राजा होते ज्यांनी प्रजेच्या जवळ राहून त्यांची ना केवळ सहायता केली पण तिथे असलेली सामाजिक समस्यांचे समाधान देखील काढले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्नाटक : मित्राचा गळा चिरून रक्त प्यायले, घटनेचा व्हिडिओ व्हायरल