शर्ट परिधान करताना तुम्ही कधी नोटीस केले आहे का? त्याच्या मागे एक लुप असतो. अनेकांना असे वाटते, की हा लुप शर्ट अडकविण्यासाठी असावा. परंतु याचा वापर केवळ शर्ट टांगण्यासाठीच नाही तर अनेक गोष्टींसाठी होतो. पूर्वीच्या काळात वॉर्डरॉब नसायचे. यामुळे यावर क्रिच पडू नये म्हणून ते चांगल्या पद्धतीने यामुळे अडकविले जात. शर्टला लुप लावण्याचा ट्रेंड हा 1960 मध्ये सुरू झाला. हा ट्रेंड Ivy league द्वारे सुरू करण्यात आला. याची निर्माती करणार्याने Locker Loop नाव दिले होते. परंतु, यानंतर याला fairy loop, fag tag आणि fruit loop च्या नावानेही ओळखले जाऊ लागले. सध्या आपल्याजवळ वॉर्डरॉब, कपाट आहे. यामुळे हा लुप केवळ एक शो पिसच म्हणून राहिला आहे. हा लुप रिलेशनशिपचे प्रतीक म्हणूनही ओळखला जातो. काही देशामध्ये जर एखादा मुलगा एखाद्या मुलीसोबत रिलेशनमध्ये असेल तर त्याला हा लुप काढावा लागतो. काहींच्या मते, या लुपचा टाय अडकविण्यासाठी वापर होतो. आणि याचा वापर आजही केला जातो.