Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्मार्टफोनमुळे लहान मुलं उशिरा बोलायला शिकतात

स्मार्टफोनमुळे लहान मुलं उशिरा बोलायला शिकतात
जे पालक आपल्या चिमुरड्याला स्मार्टफोन किंवा टॅबलेट हाताळण्यासाठी देतात, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण स्मार्टफोन आणि टॅबलेटचा अधिक काळ वापराने मुलांच्या बोलण्याची क्षमता विकसित होण्यास उशीर लागतो.
टोरंटोमध्ये 2011 ते 2015 दरम्यान या विषयावर संशोधन झालं आहे. या संशोधनात सहा महिन्यांच्या मुलापासून ते दोन वर्षांच्या मुलापर्यंतच्या 894 मुलांवर अभ्यास करण्यात आला. यात 18 महिन्यापर्यंतच्या अध्ययनात 20 टक्के मुलं सरासरी 28 मिनिटे स्मार्टफोन आणि टॅबलेटसारखी उपकरणं वापरत असल्याचं आढळून आलं.
 
स्मार्टफोन किंवा टॅबलेटसारखी उपकरणं हाताळणार्‍या मुलांच्या बोलण्याच्या क्षमतेचा विकास होण्यास वेळ लागत असल्याचंही दिसून आलं. यातील स्क्रीन टाईममध्ये 30 मिनिटांच्या वेळते स्पीच डेव्हलपमेंटचा धोका 49 टक्के असल्याचं संशोधनानंतर डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संयुक्त राष्ट्राचा अहवाल, नोटाबंदीतून काळ्या पैश्याला आळा शक्य नाही