Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येथे एकटीच लग्न लावते वधू, वराची गरज नाही

येथे एकटीच लग्न लावते वधू, वराची गरज नाही
आजपर्यंत आपण लग्नासाठी वर-वधूची आवश्यकता असते असेच पाहिले किंवा ऐकले असाल. मात्र, जपान येथील वधूला वराची गरज नसते. ती एकटीच लग्न करते. हे अशा काही मुलींसाठी आहे ज्यांना लग्न तर करायचे असते, परंतू कोणासोबत आयुष्यभर राहायचे नसते.
 
अशा मुलींसाठी एका कंपनीने हटके पॅकेज तयार केले आहे. त्या पॅकेजद्वारे तुम्ही एका दिवसासाठी नवरीचे आयुष्य जगू शकता. कंपनीने यासाठी रजिस्ट्रेशनची सुविधादेखील उपलब्ध केली आहे. ज्या दिवशी कंपनीचा मेकअपमॅन नवरीला पूर्णपणे तयार करतो. त्यानंतर नवरीचे फोटोसेशन होते.
 
नवरीचा ड्रेस आणि लग्नाच्या पार्टीचे आयोजन हे वधूच्या मनानुसार केले जाते. या पॅकेजमध्ये दोन पद्धतीने लग्न करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे शाही पद्धतीने आणि दुसरे म्हणजे साध्या पद्धतीने. वधूने आपली इच्छा दर्शवल्यास त्याच पद्धतीने तिचे थाटात लग्न होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुपवाडात सेनेच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला