Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येथे प्रायव्हेट आणि शासकीय शाळेत काहीही अंतर नाही

येथे प्रायव्हेट आणि शासकीय शाळेत काहीही अंतर नाही
इरफान खानच्या हिंदी मीडियम या सिनेमात भारतात शासकीय आणि खाजगी शाळेतील अंतर अगदी चांगल्यारीत्या दर्शवण्यात आले होते. परंतू या देशात शासकीय शाळादेखील खाजगी शाळेप्रमाणेच चांगल्या आहेत.
 
भारतात या दोन्ही शाळांमध्ये क्लासरूम, शिक्षकांच्या शिकवण्याची शैली, वातावरण अश्या अनेक गोष्टींमध्ये अंतर स्पष्ट कळून येतं. अशात कमाई कमी असली तरी पालक आपल्या मुलांना प्रायव्हेट शाळेत टाकू इच्छित असतात. परंतू जर्मनी येथे असे नाही. येथे मात्र 9 टक्के मुलं प्रायव्हेट शाळेत शिकतात. निश्चितच या दोन्ही शाळेतील फीसमध्ये मोठं अंतर आहे. जेथे शासकीय शाळेत मुलं सरासरी फ्री मध्ये शिक्षण घेतात तिथे प्रायव्हेटमध्ये किमान लाख रुपये फीस भरावी लागते.
तरी दोघांचे परिणाम सारखेच. एका ताज्या शोधाप्रमाणे मुलांच्या लेवलमध्ये कुठलेही अंतर दिसून आलेले नाही. फ्रीडरिष एबर्ट फाउंडेशनद्वारे केलेल्या शोधामध्ये 67,000 मुलांवर सर्व्हे करण्यात आले. त्यात जर्मन आणि इंग्रजीची परीक्षा घेण्यात आली आणि गणिताचे उदाहरणं सोडवायला दिले गेले. परिणाम हा होता की दोन्ही शाळेतील मुले एक सारखी समजू शकत होती. 9 वी आणि चौथी या दोन्ही वर्गातील मुलांनी सारखे परिणाम दिले.
 
भाषांबद्दल बोलायला गेलो तर भाषा ऐकून समजण्यात प्रायव्हेट शाळेतील मुलं अधिक सक्षम ठरले. परंतू शोधकर्त्यांप्रमाणे त्यात शाळेपेक्षा त्यांच्या कुटुंबाची भूमिका अधिक सक्रिय आहे. महागड्या शाळेत शिकणार्‍या मुलांचे आई-वडील आर्थिक रूपाने सक्षम असून चांगल्या प्रकारे भाषेचा वापर करतात. याव्यतिरिक्त प्रायव्हेट शाळेतील मुलांसाठी परदेशात एक्सचेंज प्रोग्राम असतात ज्यामुळे मुलांना भाषा सुधारण्याची संधी मिळते. परंतू त्याने क्लासरूममध्ये प्राप्त होत असलेल्या शिक्षणात कोणतेही मोठे अंतर दिसून आलेले नाही.
 
जर्मनी पत्रिका डेय श्पीगल यात प्रकाशित लेखानुसार, आतापर्यंत जर्मनीतदेखील प्रायव्हेट शाळांना अधिक योग्य मानले जात होते. ही धारणा नव्वदाच्या दशकात प्रायव्हेट शाळांबद्दल कौतुकास्पद लेख प्रकाशित झाल्यामुळे बनली असावी. कोणती शाळा उत्तम आहे, हे जाणून घेण्याची स्केल मात्र एकच आहे आणि ते म्हणजे परीक्षेत मुलांचे मार्क्स. परंतू ताज्या शोधामध्ये इतर गोष्टींकडेही लक्ष दिले जाते जसे मुलं कोणत्या पृष्ठभूमीतून येत आहे, त्यांचे आई वडील जर्मन आहे वा परदेशी, मुलींच्या तुलनेत मुलांचे स्तर काय.
 
या शोधात एक सारख्या कुटुंबातून येणार्‍या मुलांची तुलना करण्यात आली आहे आणि परिणामस्वरूप प्रायव्हेट शाळेत शिक्षण घेणारे मुलं शासकीय शाळेतील मुलांपेक्षा उत्तम नसतात हे कळून आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

येत्या 2 एप्रिल पासून एच1-बी व्हिसाचे प्रक्रिया सुरु होणार