Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केवळ सबरीमाला मंदिरच नव्हे तर येथे देखील महिलांना प्रवेश नाही

temple where womens are not allowed
केरळमधील सर्वात प्रसिद्ध आणि हल्ली वादग्रस्त सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील बंदी उठविण्यात आली आहे. आता या मंदिराचे फाटक सर्व वयोगटातील महिलांसाठी उघडले आहे. सुप्रीम कोर्टाच्या संवैधानिक खंडपीठानुसार प्रत्येकाला मंदिरात भेदभाव केल्याशिवाय पूजा करण्याची परवानगी असली पाहिजे. परंतु हे भारताचे एकमेव मंदिर नव्हते, जेथे महिलांचा प्रवेश प्रतिबंधित आहे. असे अजूनही देवतांचे ठिकाण आहेत, जेथे स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही.
 
भारतातील काही पवित्र स्थळ जेथे महिलांना प्रवेश करण्यास परवानगी नाही
 
पद्मनाभस्वामी मंदिर, केरळ
पद्मनाभस्वामी मंदिर हे भारतातील केरळ राज्यात तिरुवनंतपुरम येथे स्थित विष्णूचे प्रसिद्ध मंदिर आहे. विष्णू भक्तांच्या पूजेसाठी पद्मनाभ स्वामी मंदिर एक महत्त्वाचे स्थान आहे. असे मानले जाते की विष्णू देवांची प्रतिमा प्रथम येथे सापडली होती. येथील मंदिर कक्षात महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. मंदिर परिसरात येणार्‍या स्त्री आणि पुरुषांसाठी ड्रेस कोड निर्धारित केलेले आहेत.
 
कार्तिकेय मंदिर, पुष्कर
राजस्थानच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पुष्कर येथे स्थित कार्तिकेय मंदिरातही स्त्रियांसाठी प्रवेश प्रतिबंधित आहे. येथे स्त्रियांनी प्रवेश केल्यास त्या शापित होतील व त्यांना देवाचा आशीर्वाद मिळणार नाही अशी समजूत आहे. या अंधविश्वासामुळे स्त्रिया स्वत: मंदिरात जाणे टाळतात.
 
जामा मस्जिद, दिल्ली 
हिंदूप्रमाणे मुस्लिम लोकांमध्ये काही मान्यता अश्या आहेत ज्यामुळे महिलांना जाण्यास बंदी घातलेली आहेत. दिल्लीतील जामा मस्जिद भारतातील सर्वात मोठ्या मशीदींपैकी एक आहे. या दर्गामध्ये देखील महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे.
 
हाजी अली दर्गा, मुंबई
महाराष्ट्राच्या मुंबई स्थित हाजी अली दर्गा येथे केवळ मुस्लिम नव्हे तर सर्व धर्मांचे लोकं मनोभावे डोकं टेकतात. हे स्थळ सांप्रदायिक सौहार्दासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईच्या वरळी बीचच्या लहान बेटावर हे स्थित आहे. हाजी अली दर्गाच्या आतल्या भागामध्ये महिलांना प्रवेश नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशात करदात्यांची संख्या वाढली