Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्वसमावेक्षक व्यक्तिमहत्व आणि कवी मनाचं वत्कृत्व : श्रद्धेय अटलजी

सर्वसमावेक्षक व्यक्तिमहत्व आणि कवी मनाचं वत्कृत्व : श्रद्धेय अटलजी
, शनिवार, 25 डिसेंबर 2021 (21:32 IST)
अटलजींच्या स्मृती आजही प्रत्येक भारतीयांच्या स्मरणात आहेत.मनमोहक अन जादूई व्यक्तिमहत्व यामुळे जनसंघाचा भाजपा झाला.अन काही वर्षातच भाजपाने 2 खासदारावरुन आज 300 पार खारदारांपर्यत मजल मारलीय.ह्यासर्वांचे श्रेय जाते ते म्हणजे श्रद्धेय अटल जीं यांनाच .आजहीभारतातील तरुण श्रद्धेय अटलजींना मानणारा आहे.अजात शत्रु असलेले अटलजी विरोधकांमध्येही खुप लोकप्रिय होतें.खुद अटटलजींच कौतुक पं नेहरुंनी केलं होतं. एक दिवसा ही व्यक्ति पंतप्रधान होणार अस खुद नेहरुनीच बोलून अटलजींच कौतुक केलं होत.
भारताच्या राजकारणात असा राजकारणी कधी होणारही नाही असा निष्णात राजकारणी ह्या भारताला लाभला ही इश्वरी कृपाच .26 पक्षएकत्र सांभाळण काही सोप काम नाही.असा सर्वसमावेक्षकव्यक्तिमहत्व निष्णात  राजकारणी भारताला लाभला होता.
अटलजींनी त्यांच्या वत्कृत्वाने अनेकांची मने जिंकली .अन त्यात ते कवि मनाचे मग तर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची श्रोत्यांच्या काळजाला भिडणारं हे व्यक्तिमहत्व होतं.राजकारणात तर 26 पक्ष असे सांभाळले जसे एकाच कुटूंबातील सदस्य आहेत.वेगवेगळ्या विचारांतील पक्षांबरोबर सत्ता टिकवून ठेवण्याची तारेवरची कसरत अटलजी लिलया सांभाळत होते.कुठल्याच राजकिय पक्षाला चार वर्ष NDAसोडावसा वाटला नाही.सर्वसमावेक्षक सरकार जनतेला अटलजींमुळेच लाभलं .सेना भाजपच्या युतीत बाळासाहेब ठाकरे अटलजीं यांच्या मार्गदर्शनाखाली युती येवढी वर्ष तग धरुन होती. हे NDA त्याकाळी अटलजींनी कस सांभाळलं असेल आताच्या परीस्थितीवरुन आपण जाणून घेवू शकतो.
संघाच्या कुशीत वाढलेले अटलजी यांना चांगलच माहीत होत गंभीर परिस्थितीतही कस तग धरावा. कारण संघ प्रचारकाला प्रचारक असताना काय यातना होतात त्या प्रचारक असलेली व्यक्तिच सांगू शकते.कारण प्रचारक हाच संघाचा आत्मा आहे अन प्रचारकाला बघून लोक संघात येत असतात. प्रचारक असताना ह्या सार्या गोष्टी अटलजींना मिळाल्या. म्हणजे आपसूक त्यांच्यात एक कुशल संघटक निर्माण झाला आज भाजप नावाचा वटवृक्ष उभाराहीला आहे.त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मोदीजीही एक कुशल संघटक संघामुळेच मिळले.
अटलजींच परराष्ट्र धोरणही तेवढच महत्वाच आहे.अटलजी कवि असल्यामुळे त्यांना सर्व अखंड भारत दिसत होता. म्हणून काय अटलजींनी रक्त सांडून काश्मिर प्रश्न नाही सुटणार तर  म्हणून त्यांनी लाहोर बस सुरू केली पण सापाला किती दुध पाजा तो दंश करायच नाही सोडत म्हणूनच काय तर कारगिल युद्ध झाला आणि त्यात पाकला पराभव स्विकारावा  लागला .इस्राईल बरोबर मैत्रीपुर्ण संबंध निर्माण केले ते श्रद्धेय अटलजी यांनीच .इस्राईली राष्ट्रपती शरोऩ 2003 मधील त्यांची भेट भारत इस्राईल मैत्रीसाठी महत्वाची मानली गेलीय.तोच कित्ता आज नरेंद्रजी मोदी गिरवताय.
Virendra sonawane
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नासाने जगातील सर्वात मोठी दुर्बीण जेम्स वेब (James Webb)अंतराळात प्रक्षेपित केली