भारतात नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवस्था लागू करण्यावर विचार केला जात आहे. चला एक नजर टाकू सर्वात अधिक कॅशलेस देशांवर:
10. दक्षिण कोरिया
येथे सर्व कन्झ्यूमर पेमेंटचा 70 टक्के भुगतान कॅशलेस होतं. येथील 58 टक्के लोकांकडे डेबिट कार्ड आहे.
9. जर्मनी
येथे कन्झ्यूमर पेमेंटचा 76 टक्के भुगतान कार्ड किंवा कॅशलेस होतं. 88 टक्के लोकसंख्येकडे डेबिट कार्ड आहे.
8. अमेरिका
अमेरिकेत 72 टक्के लोकांकडे डेबिट कार्ड आहे जेव्हाकि एकूण कन्झ्यूमर पेमेंटचा 80 टक्के पेमेंट कॅशलेस होतं. येथे एटिएम मशीनच्या प्रासंगिकतेवर प्रश्न निर्माण होतात.
7. नेदरलँड्स
येथे एकूण कन्झ्यूमर पेमेंटचा 85 टक्के पेमेंट कॅशलेस होतं. येथील 98 टक्के लोकांकडे डेबिट कार्ड आहे. राजधानी ऍमस्टरडॅम येथे पार्किंगमध्येही कार्डने पेमेंट केले जातं.
6. ऑस्ट्रेलिया
येथे 79 टक्के लोकांकडे डेबिट कार्ड आहे जेव्हाकि कन्झ्यूमर पेमेंटचा 86 टक्के कॅशलेस असतं. येथे कॅशलेस पेमेंटवर जोर देण्यासाठी अनेक ऑफर दिले जातात.
5. स्वीडन
स्वीडनमध्ये 2008 मध्ये 110 वेळा बँक दरोडा पडला तर 2011 मध्ये याची संख्या घटून 16 झाली. कारण बँकेत कमीत कमी कॅश असणे. येथे कन्झ्यूमर पेमेंटचा 89 टक्के भाग कॅशलेस आहे. देशातील 96 टक्के लोकांकडे डेबिट कार्ड आहे.
4. ब्रिटन
लंडनच्या प्रसिद्ध डबल डेकर बसमध्ये चढण्यापूर्वी सुनिश्चित करून घ्या की आपल्याकडे ओइस्टर कार्ड किंवा प्रीपेड तिकीट आहे की नाही, कारण येथे कॅश चालत नाही. तसेच पूर्ण ब्रिटनमध्ये कॅशचा वापर घटत आहे. एकूण कन्झ्यूमरचा 89 टक्के कॅशलेस असतं आणि 88 टक्के लोकांजवळ डेबिट कार्ड आहे.
3. कॅनडा
येथे कन्झ्यूमर पेमेंटचा 90 टक्के कॅशलेस होतं जेव्हाकि 88 टक्के लोकांकडे डेबिट कार्ड आहे. येथे 2013 पासून सेंटचे शिक्के बंद केले गेले आहेत. अर्थात येथे कॅशलेसवर अधिक जोर आहे.
2. फ्रान्स
येथे 69 टक्के लोकांकडे डेबिट कार्ड आहे, तसेच एकूण कन्झ्यूमर पेमेंटचा 92 टक्के भाग कॅशलेस असतं. फ्रान्समध्ये तीन हजार युरो हून अधिक कॅशच्या देण-घेणची परवानगी नाही.
1. बेल्जियम
सध्या हा दुनियेतील सर्वात अधिक कॅशलेस देश आहे जिथे एकूण कन्झ्यूमर पेमेंटचा 93 टक्के भाग कॅशलेस असतं. देशातील 86 टक्के लोकसंख्येकडे डेबिट कार्ड आहे. येथे तीन हजार युरो हून अधिक कॅशचे देण-घेण केल्यावर दोन लाख युरोचा दंड भोगावा लागू शकतो.