Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉक्टरांच्या कलेचा अनोखा संगम “डॉक्टर्स आर्ट शो”

Doctors Art Show
, सोमवार, 4 डिसेंबर 2023 (09:39 IST)
वैद्यकीय व्यवसाय सांभाळून चित्रकला, फोटोग्राफी अशा विविध कला छंद म्हणून जोपासणार्‍या डॉक्टरांच्या कलाकृतींचे प्रदर्शन “डॉक्टर्स आर्ट शो” मुंबईत वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. ५ ते ११ डिसेंबर, २०२३ हया दरम्यान आयोजित करण्यात आले असून हया प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता नेहरू सेंटर आर्ट गॅलरी मध्ये होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. जगन्नाथराव हेगडे (माजी नगरपाल), अॅड. धनराज वंजारी (ज्येष्ठ व्याख्याते व साहित्यिक, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त, आप (ओबीसी) नेते, महाराष्ट्र), सुप्रसिद्ध स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री वर्षा उसगांवकर, ख्यातनाम चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन, डॉ. पूजा मेंधे (मिस इंडिया इंटरनॅशनल – 2018), ख्यातनाम चित्रकार रामजी शर्मा, अजयकांत रुईया (डायरेक्टर, ऑल स्टेट ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज) यांच्यासहित कला व उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. दीपकला फाऊंडेशनच्या वतीने हया कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात आणि इंग्लंड येथील प्रसिद्ध ५० डॉक्टरांचा समावेश असून कला आणि विज्ञान यांचा अनोखा संगम रसिकांना पाहायला मिळणार आहे. हया प्रदर्शनातील चित्रांच्या विक्रीतील १० टक्के रक्कम अनाथ मुलांच्या मदतीसाठी दीपकला फाऊंडेशनला देण्यात येणार आहे.
 
डॉक्टर्स कला प्रदर्शनात डॉ. शेखर भोजराज, डॉ. विनोद इंगळहलीकर, डॉ. सोनल शाह, डॉ, सोनाली सराफ, डॉ. मिनू आचरेकर, डॉ. प्रीतम साळवी, डॉ. गायत्री देशपांडे, डॉ. डायना गाला, डॉ. विजय पिसाट, डॉ. किशोर बाटवे, डॉ. व्योमिका जशनानी, डॉ. निराली मकनी, डॉ. दत्ताराम कोळी, डॉ. तन्वी महेंद्रकर, डॉ. फिरदौस शेख, डॉ. मृणालिनी वाकचौरे, डॉ. ध्रुवी जैन, डॉ. तन्वी दावडा, डॉ. शीतल मिस्त्री, डॉ. कंनुप्रिया हलन, डॉ. प्रकाश बोरा, डॉ. पूजा मेंधे, डॉ. ऐश्वर्या कुमार, डॉ. मिलन सिंग ठोमर यांच्यासहित अनेक डॉक्टर्स सहभागी झाले असून त्यांची चित्रकला व फोटोग्राफी पाहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन दि. ५ ते ११ डिसेंबर, २०२३ हया कालावधीत रोज ११ ते ७ हया वेळेत रसिकांना विनामुल्य पाहता येणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजकारणच नव्हे, महाराष्ट्राचा स्वभावही उत्तरेसारखा होतोय - सुहास पळशीकर