Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 11 January 2025
webdunia

Vinoba Bhave death anniversary व्यक्ति‍विशेष : विनोबा भावे

Vinoba Bhave death anniversary व्यक्ति‍विशेष : विनोबा भावे
, बुधवार, 15 नोव्हेंबर 2023 (09:29 IST)
Vinoba Bhave death anniversary विनोबा भावे यांचा जन्म महाराष्ट्रातील कुलाबा (आता रायगड) जिल्ह्यातील गागोडे गावात 11 सप्टेंबर 1895 रोजी एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नरहरी शंभूराव आणि आईचे नाव रुक्मणी होते. त्यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा खोलवर प्रभाव होता. भगवद्गीता, महाभारत आणि रामायण यांसारख्या धार्मिक ग्रंथांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.
 
विनोबा भावे म्हणाले की, त्यांना गांधीजींमध्ये हिमालयातील शांतता आणि बंगालचा क्रांतिकारी आवेश दिसतो. गांधीजींनी विनोबा भावे यांना त्यांचे विचार चांगले समजले, असे म्हणत त्यांचे कौतुक केले होते. गांधीजींनी 1940  मध्ये ब्रिटिश सरकारच्या युद्ध धोरणाविरुद्ध राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी विनोबा भावे यांची निवड केली होती.
 
थोर गांधीवादी आचार्य आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे यांचा आज जन्म‍दिन. कोकणातील रायगड जिल्ह्यात गागोदे या पेण तालुक्यातील गावी 11 सप्टेंबर 1895 रोजी विनायक नरहर भावे यांचा जन्म झाला. भगवद्गीतेचे सार सोप्या रसाळ शैलीत ‘गीताई’ आणि ‘मधुकर’ सारख्या ग्रंथांतून सांगणार्‍या विनोबांची भेट 7 जून 1916 रोजी मोहनदास गांधी नावाच्या एका महात्म्याशी झाली आणि त्यांच्या आयष्यानेच एक नवे वळण घेतले.
 
त्याक्षणापासून ब्रह्मचर्याची शपथ घेऊन त्यांनी जीवनसाधनेस सुरूवात केली. वाई मुक्कामी स्वामी केवलानंद सरस्वतींच्या चरणाशी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, शांकरभाष्य व पातंलजोगाचे शिक्षण घेतले. पुढे 1921मध्ये जमनालाल बजाजांनी साबरमतीच्या आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. तिचे संचालक म्हणून 8 एप्रिल 1921 रोजी महात्माजींच्या 1940 त्या वैयक्तिक सत्याग्रहाचे गांधीजींनी निवडलेले पहिले ते सत्याग्रही होते. 1951 ते 53 हा भूदान यात्रेचा कालावधी वगळता सारे आयुष्य वर्ध्याच्या पवनार आश्रमात काढलेल्या विनोबांनी 15 नोव्हेंबर 1982 रोजी तेथेच आपली देहयात्रा संपविली. सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन सन्मान केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथ शिंदे गटाचे दोन नेते एकमेकांना देशद्रोही का म्हणत आहेत? काय आहे मुंबईतील या सीटची कहाणी?