कार्यकर्त्यात संघटन कौशल्य अन नैतृत्व गुण असनं गरजेच आहे.कार्यकर्त्यात त्याग असनं खुप गरजेच असतं . त्यागाशिवाय कार्यकर्ता घडत नाही. मेहनतीशिवाय कार्यकर्ता अन कार्यकर्त्याशिवाय संघटन कधीच घडत नाही.संघटन कस असावं याच उदाहरण म्हणजे लहान पणी एका शेतकर्याच उदाहरण आपण द्यायचो.शेतकर्याला पाच मुलं असतात त्यांच्यात भांडण होते अन ते शेताच्या वाटण्या करण्याचं ठरवतात. हे वडील बघत असतात तेव्हा शेतकरी त्यांना एक काडी देतो अन तोडायला सांगतो काडी सहज तुटते. पण शेतकरी सर्वांना त्या पाच काठ्या एकत्र करुन तोडायला सांगतात तर काठी तोडण्यासाठी खुप वेळ लागतो. अन तेव्हा संघटन काय असत अन त्याच महत्व काय हे त्या शेतकर्याला समजत.
एक कार्यकर्ता असा असावा की त्याच व्यक्तिनहत्व बाकी दहा कार्यकर्त्यांनी समजून त्यापद्धतीने अनुकरण केलं पाहीजे.संघटन व्यक्तिकेंद्रीत कधीच नसतं अन कार्यकर्त्यालानेही व्यक्तिकेंद्रीत होऊ नये. उदाहरणार्थ मोदींकडे बघून असंख्य कार्यकर्ते भाजपात आले आहेत पण आज भाजप खुप मोठा पक्ष आहे . व्यक्ति केंद्रीत पक्ष राजकारणात फार थोडे आहे. मोदी गेल्यावर भाजप दुसर्या राष्ट्रीय नेता घेवून येईल किंवा मोदींनी तशी रचनाच करुन ठेवली असेल. असो सांगायचा उद्देश हाच कार्यकर्त्यांचा पक्ष त्यातून उभारलेल संघटन दिर्घकाळ टिकत जे आपण उदाहरण बघत आलो आहोत. संघ असेल किंवा इतर संघाची वेगवेगळी आयाम असतील ही नेहमीच स्थानिक पातळीवर काम करणारी आहेत . जो नेता स्थानिक पातळीवर काम करुन पुढे जातो त्याला कधीच कसली अडचन येत नाही किंवा तो संघटनात्मक बाबतीत मुरलेला असतो.संघ प्रचारक विस्तारक पाठवते त्यामागील ही तेच कारण आहे कि संघटन कस उभ राहील अन पुर्णवेळ कार्यकर्ता कसा निर्माण होईल.
कार्य कर्ता हा सुरूवातीला शुन्यच असतो पण त्याला विविध संघटनात्मक प्रमुखांकडून मिळलेली प्रशिक्षण यातून तो शिकत असतो कार्यकर्ता घडवण्याचं काम हे त्या संघटनात्मक प्रमुखाच असतं त्यांच्याबरोबर सुख दुःखाच्या गोष्टी करणं त्याला वेळोवेळी भेटून त्यांच्या अडचणी समजून घेणं हे महत्वाचं असतं कार्यकर्ता का नाराज आहे अन त्याला अपेक्षीत काय आहे अन तो खरच त्या कामास त्या जबाबदारीही पात्र आहे का हेही बघणं गरजेचं असतं
कुठलाही पक्ष असेल त्या पक्षाच संघटनात्मक कार्य करणारी व्यक्तीने आधी जाणून घ्यावं की पक्षात आलेला कार्यकर्ता खरच त्या पात्रतेचा आहे तो पक्षास हाणी तर नाही ना पोहचवणार त्यापासून पक्षाचा किती फायदा आहे हे न बघता पक्षाला त्याचा कसा उपयोग होईल हे पाहण गरज आहे
आपल्याला पक्षाला किती वेळ देता येईल अन पक्षाला त्यावेळेतून पक्षाला किती फायदा करुन घेता येईल हे बघन गरजेचं आहे
कार्यकर्त्यांनी पक्ष आपल्यासाठी नाही तर पक्षासाठी आपण आहोत हे समजून घेऊन काम करणं महत्वाच.
जबाबदारी अन् कार्यकर्ता कधी कधी जबाबदारी देत असताना कार्यकर्त्याला डावललं जात पण त्यातूनही कार्यकर्त्यान शिकावं ती जबाबदारी तुला मिळत नाही याचा अर्थ तू कुठंतरी कमी पडत आहे सुधारण्यास तुला वाव आहे पण नेतृत्वाची जबाबदारी आहे की सर्वांना योग्य न्याय मिळावा
कार्यकर्ता चारित्र्यवान संघटनेत असलेली मुलगी ही आपली बहीणच संघटनेबाहेरील मुलगी ही ही आपली बहीणच गुणवान कर्तुत्ववान नेतृत्व संपन्न अन् राहणीमान उच्च असा कार्यकर्ता कसा होता येईल अन आपण नेहमी नम्र अन् आपल्याला कसं शिकता येईल वरीष्ठांकडून ते बघन महत्वाच.
Virendra sonawane